24 January 2021

News Flash

रेल्वे शौचकुपात पाय अडकलेल्या महिलेची सुटका.. सहा तासांनंतर!

कोकण रेल्वे तंत्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेची सुखरूप सुटका झाली

मुंबईहून येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शौचकुपात पाय अडकून पडलेल्या महिलेची सुटका करण्यासाठी तब्बल सहा तास लागल्याची घटना शुक्रवारी घडली. कोकण रेल्वे तंत्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेची सुखरूप सुटका झाली खरी मात्र त्यासाठी कोकणकन्या एक्स्प्रेसचा डबाच वेगळा काढावा लागला. महिलेची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात तिची रवानगी करण्यात आली आहे.

घाटकोपर येथील रहिवासी असलेल्या रबियाबी शेख (६५) या कोकणकन्या एक्स्प्रेसने गावी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या शुक्रवारी पहाटे शौचकुपातून बाहेर येत असताना त्यांचा पाय शौचकुपाच्या पाइपमध्ये अडकला. त्यांनी पाय काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो आणखीनच खोलात गेला. रबियाबींनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. हा सर्व प्रकार खेड व चिपळूण स्थानकांदरम्यान घडला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रबियाबींची सुटका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे रत्नागिरी स्थानकात हा डबा एक्स्प्रेसपासून वेगळा करण्यात आला. त्यानंतर कोकण रेल्वेच्या तंत्रज्ञांनी रबियाबींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. पायाला इजा न करता रबियाबींची सुटका करण्याचे आव्हान तंत्रज्ञांसमोर होते. त्यासाठी सर्वप्रथम शौचकुपाचा दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर गॅस कटरने शौचकुपाचा पाइप तोडण्यात आला. सहा तास ही सर्व कसरत चालली. अखेरीस शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास रबियाबींची सुखरूप सुटका करण्यात यश आले. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कार्यवाही करण्यात आली.
मुंबई : प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त संतोष जांगरे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. या प्रकरणी सीबीआयने कार्यालयात तसेच निवासस्थानी छापा टाकून मालमत्तांची कागदपत्रे, दागिने तसेच सोन्याची दीड किलो वजनाची नाणी आदी ऐवज हस्तगत केला. एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्राप्तिकराची नस्ती तपासणीसाठी जांगरे यांनी घेतली होती. त्यात अनेक त्रुटी असल्याचे सांगून त्यांनी व्यावसायिकाच्या सनदी लेखापालाला बोलावून घेतले होते. तडजोड करण्यासाठी भेटण्यासही सांगितले होते. अखेरीस तडजोडीपोटी जांगरे यांनी सुरुवातीला ३० लाखांची लाच मागितली होती. अखेरीस २५ लाखांवर तडजोड करण्यात आली. या लाचेच्या रकमेपैकी पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता ताडदेव येथील पिरामल चेंबर्सच्या कार्यालयात आणून देण्यास त्यांनी व्यावसायिकाला सांगितले होते. लाचेची ही रक्कम स्वीकारताना जांगरे यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 4:51 am

Web Title: konkan railway officials save elderly woman stuck in toilet by detaching coach of train
टॅग Konkan Railway
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’बाबत राजकारण!
2 स्वातंत्र्यसेनानी नारायणदासजी जाजू यांचे निधन
3 चालू शैक्षणिक वर्षांत तीनऐवजी दोनच पायाभूत चाचण्या
Just Now!
X