11 August 2020

News Flash

कोरेगाव-भीमा हिंसाचार: राहुल फटांगडे हत्येप्रकरणी टेंभुर्णीतून एकजण ताब्यात

पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथून २१ वर्षीय सुरज शिंदेला ताब्यात घेतले आहे. तो मूळचा मुळचा दौंड तालुक्यातील भीमनगरचा रहिवासी आहे.

मृत राहुल फटांगडे

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात राहुल फटांगडेच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून २१ वर्षीय सुरज शिंदेला ताब्यात घेतले आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथून सूरजला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते.

सूरज हा मुळचा दौंड तालुक्यातील भीमनगरचा रहिवासी आहे. यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमदनगरमधील आहेत.

राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जारी केली होती. दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रे आणि चलचित्रे जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2018 6:49 pm

Web Title: koregaon bhima riots pune rahul fatangade murder case police arrested suraj shinde from tembhurni solapur
Next Stories
1 जेलमध्ये गजाआडून डीडीचे कार्यक्रम बघायचो – छगन भुजबळ
2 अटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ
3 मुंबई – दीपिका पादुकोण राहत असलेल्या इमारतीमध्ये 33 व्या मजल्याला आग
Just Now!
X