News Flash

कोतवालांच्या मानधनात २५०० रूपयांनी वाढ

कोतवाल कर्मचाऱ्यांना अपघात विम्याचे संरक्षणही देण्यात येणार

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या अनेक दिवसांपासून मानधनात वाढ करण्याची कोलवातल कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले आहे. कोतवाल कर्मचाऱ्यांनी सतत केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. आज मंगळवारी राज्य सरकारने कोतवालांच्या मानधनात दोन हजार ५०० रूपयांनी वाढ केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कोतवालांना ५ हजार रूपयांऐवजी ७ हजार ५०० रूपये वेतन मिळणार आहे. ड वर्गात काम करणार्या कोतवालांसारख्या कर्मचाऱ्यांनाही त्यांची पूर्ण नियुक्ती होईपर्यंत १५ हजार रूपयांचे मानधन देणार आहेत.

राज्यभरात १२ हजार कोतवाल कार्यरत आहेत. तर ६ हजार कोतवालांची पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. ज्या कोलवाल कर्मचाऱ्यांची सेवा १० ते २० वर्ष जाली आहे. अशांना मानधनात ३ टक्के वाढ देण्यात आली आहे. ज्या कोतवालांची सेवा २० ते ३० वर्ष झाली आहे त्यांच्या मानधनात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर ज्यांची सेवा ३१ वर्षापेक्षा जास्त झाली अशा कोतवालांच्या मानधनात टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्या कोतवालांची ५० वर्षे सेवा झाली आहे त्यांना १५ हजार मानधन देण्यात येणार आहे.

याशिवाय कोतवाल कर्मचाऱ्यांना अपघात विम्याचे संरक्षणही देण्यात येणार आहे. अटल निवृत्ती योजनेमध्येही कोतवालांचा समावेश करण्यात येणार असून सर्व पैसे राज्य सरकार भरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 4:27 pm

Web Title: kotwal salary increase 2500 rupees
Next Stories
1 ‘नितीन गडकरींच्या गांधी घराणे प्रेमाचे कारण काय?’
2 असा आहे उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X