पाऊस लांबल्याने खरिपाचे नुकसान

सध्या ‘ऑक्टोबर हीट’ आणि ढगाळ वातावरणात कोसळणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी अस्मानी संकट बनला आहे. परंतु यंदाच्या पावसाने अनेक उच्चांक नोंदवले आहेत. अलीकडील काळातील हा सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचा हंगाम राहिल्याची आकडेवारी आहे. कोयना धरणामध्ये तर जलाशयाच्या एकूण क्षमतेच्या तब्बल सव्वादोनपट पाण्याची आजअखेर आवक झाली असून, ही आवक जवळपास २३६ टीएमसी (धरण क्षमतेच्या २२४.२३ टक्के) इतकी आहे.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

कोयनेसह बहुतेक जलसाठे काठोकाठ भरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या पावसाने दुष्काळी भागातही त्रेधा उडवून दिली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जलटंचाईग्रस्त जनतेतून त्यामुळे आता, ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे. पावसाळा लांबला असून, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीही आज गुरूवारी सायंकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. सततच्या पावसाने काढणीला आलेली खरिपाची पिके हातची जाऊन शेतकऱ्यांचे कोटय़ावधी रूपयांचे आर्थिक नुकसान होऊन ऐन दिवाळीत बळिराजाचे दिवाळे निघाले आहे.

सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, भात, तूर, मका, द्राक्ष, टोमॅटो, डाळिंब यासह पालेभाज्या व फुलशेतीचे अति पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पीकविम्याचा आधार असला,तरी नुकसान भरपाई मिळावी अशी सर्वत्र जोरदार मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने थमान घातल्याने शेतपिकांचे नुकसान होताना, ओढे, नाले, बंधारे पुन्हा भरून वाहात आहेत. तर, नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे.

कोयना धरणाच्या पाणलोटात याखेपेस आजअखेर सरासरी ७,६८०.६६ मि.मी. (वार्षिक सरासरीच्या १५३.६१ टक्के) पावसाची नोंद आहे. त्यात नवजा विभागात सर्वाधिक ८,३९३, तर कोयनानगर विभागात ७,३३५ आणि महाबळेश्वर विभागात ७,३१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यतील धोम, कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी, मोरणा या धरणांसह छोटे जलसाठेही तुडुंब भरून आहेत.  तर, आजअखेर धोम धरणक्षेत्रात १,६०१, कण्हेर १,८०५, धोम-बलकवडी ४,६७५, उरमोडी २,४५७ तर मोरणा धरणक्षेत्रात ५,३८६ मि.मी. पावसाची नोंद आहे. सातारा जिल्ह्यत आजअखेर वार्षिक सरासरीच्या २११.१२ टक्के पावसाची नोंद आहे. त्यात  महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३९३.०१ टक्के पाऊस नोंदला असून, तो ८,१३१.४४ मि.मी. राहिला आहे. पाठोपाठ सातारा तालुक्यात २७१.७१ टक्के म्हणजेच २,२४४.२८ मि. मी. पाऊस झाला आहे.

दुष्काळी खटाव तालुक्यात २५०.६५ टक्के म्हणजेच ८६२.२३ मि.मी. व माण तालुक्यात १५३.४५ टक्के म्हणजेच ५७५.११ मि.मी. पावसाची नोंद आहे. यावर्षी कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून जवळपास ११३ टीएमसी तर पायथा वीजगृहातून पावणेनऊ टीएमसी असे एकूण १२२ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडले गेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक धरणे क्षमतेने भरलेली आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणतून २५,२९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

  • कोयनेत क्षमतेच्या २२४.२३ टक्के पाण्याची आवक
  • वार्षिक सरासरीच्या १५३.६१ टक्के पावसाची नोंद
  • नवजा विभागात सर्वाधिक पाऊस
  • दुष्काळी भागातही चांगला पाऊस