जगातील सर्वात सुंदर आणि उंच विहार करणारा पक्षी म्हणून ओळख असलेला क्रौंच पक्षी मध्य आशियातून लाखो किलोमीटरचे अंतर कापून येतो. भारतात या पक्ष्यांचे परदेशी पाहुणे म्हणून स्वागत केले जाते. मात्र, शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीवर या पक्ष्यांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जगाच्या नकाशावर संकटकालीन पक्षी म्हणून नोंद असलेल्या या पाहुण्या पक्ष्याचे मांस पौष्टिक व चविष्ट असल्याने या पक्ष्यांची हत्या होत असून शिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.

जिल्ह्यात या वर्षी तीव्र दुष्काळ आहे. बहुतांशी तलावांनी तळ गाठला असला, तरी शिरूर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्पात मात्र काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तलावाभोवती असणारे रब्बीचे धान्य आणि परिसरातील नसíगक सौंदर्याला भुलून क्रौंच पक्षी वर्षांनुवर्षे येथे वास्तव्यास येतात. जानेवारी महिन्यात लाखोंच्या संख्येने या पक्ष्यांचे थवे येऊन धडकतात. आकाशात सर्वात उंचीवरून येणारे हे पक्षी दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका, मध्य आशियातून लाखो किलोमीटर अंतर कापून येतात. तलावाच्या भोवती या पक्ष्यांची मनमोहक मांदियाळीच दिसते. पर्यटकही या पक्ष्यांना पाहण्यासाठी येथे येत असतात.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

मात्र, मागील काही दिवसांपासून या परिसरात क्रौंच पक्ष्यांची शिकार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नव्वद ते शंभर सेंटिमीटर लांब आणि पाच ते सहा किलो वजन असलेल्या या पक्ष्याचे मांस पौष्टिक व चविष्ट मानले जाते. त्यामुळे शिकाऱ्यांनी या पक्ष्याला लक्ष्य केल्याचे दिसते. तलावाच्या काठावर दोन दिवसांपूर्वी चार पक्षी मृतावस्थेत आढळले, तर तलावाच्या शेजारीही पक्ष्यांची शिकार करून मांस भाजून खाल्ल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निसर्गाच्या सौंदर्याला भुलून येणाऱ्या या पक्ष्यांसाठी तलाव जीवघेणा ठरला आहे

. याबाबत वन विभाग लक्ष देण्यास तयार नसून, पक्ष्यांची शिकार करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा पक्षिमित्र सिद्धार्थ सोनवणे यांनी दिला.