28 October 2020

News Flash

मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटही चालेल, पण…; संजय राऊतांचं नाव घेत कुणाल कामराचं ट्विट

कुणाल कामरानं संजय राऊत यांनाही केलं टॅग

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व कुणाल कामरा. (संग्रहित छायाचित्र/कुणाल कामरा ट्विटर)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्यांवरून वाद विवाद सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिनेत्री कंगना रणौतसह अनेकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. इतकं काय तर सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. पण, आता चक्क स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरानंच राष्ट्रपती राजवट लावली तरी चालेल, असं म्हटलं आहे. मात्र, कुणालनं त्यासाठी एक अट ठेवली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सीबीआय चौकशीची मागणी करत राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती. विशेषतः अभिनेत्री कंगना रणौतसह काही व्यक्तींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती राजवटीच्या मुद्यावरच कुणाल कामरानं ट्विट केलं असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबद्दल भाष्य केलं आहे.

“ज्या दिवशी संजय राऊत राष्ट्रपती असतील, त्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली, तरी मला चालेल” असं कुणाल कामरानं म्हटलं आहे.

कुणाल कामरानं अलिकडेच संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. त्याच्या ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागाची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं होणार आहे. त्यानं तशी इच्छा बोलून दाखवली होती. संजय राऊत यांनी पहिली मुलाखत दिली, तरच आपण ‘शट अप या कुणाल’च्या दुसऱ्या भागाला सुरूवात करू, असं तो म्हणाला होता.

कुणाल कामराच्या या शोमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या व सध्याच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, सचिन पायलट यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झालेली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 5:40 pm

Web Title: kunal kamra sanjay raut president rule in maharashtra kunal kamra tweet bmh 90
Next Stories
1 …पुढे काय झालं ते आपल्याला माहितीये; रोहित पवारांनी “त्या’ सभेच्या आठवणींना दिला उजाळा
2 खासदार अमोल कोल्हेंवर गुगलच्या चुकीमुळे शुभेच्छांचा वर्षाव
3 “सरकार नक्की मदत करेल, पण…”; शरद पवार महाराष्ट्रातील खासदारांसह घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Just Now!
X