News Flash

व्हेंटिलेटर हाताळणीसाठी पात्र मनुष्यबळाअभावी तडजोडीची आपत्ती

गंभीर रुग्णासाठी व्हेंटिलेटर हाच शेवटचा पर्याय ठरतो.

प्रशांत देशमुख, र्धा : व्हेंटिलेटरसाठी पात्र मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने तडजोड करण्याची आपत्ती आरोग्य व्यवस्थेवर आली आहे.

गंभीर करोना रुग्णांची संख्या दैनंदिन वाढत आहे. प्रथम औषधोपचार मग ऑक्सिजन व शेवटी व्हेंटिलेटरद्वारे रुग्णास वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न रुग्णालयाद्वारे केला जात आहे. गंभीर रुग्णासाठी व्हेंटिलेटर हाच शेवटचा पर्याय ठरतो. व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी आवश्यक त्या पात्र मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत असल्याची स्थिती आहे. निकषानुसार एका व्हेंटिलेटरवरील रुग्णासाठी एक परिचारिका व एक डॉक्टरची पूर्णवेळ उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे तीन रुग्णामागे एक परिचारिका निगराणीसाठी ठेवण्याची आपत्ती रुग्णालय व्यवस्थापनावर ओढवली आहे.

जिल्हय़ात सध्या ६८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. करोनापूर्व काळात त्याचा फोरसा उपयोग झालेलाच नव्हता. म्हणून काही निरुपयोगी ठरल्याचे ऐकायला मिळाले. व्हेंटिलेटरचा उपयोग नसल्याने पात्र मनुष्यबळही तयार झाले नाही. मात्र करोनाने या अशा आवश्यक उपकरणांना काम उपलब्ध करून दिले. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची हाताळणी अतिशय कौशल्याने करावी लागते. ऑक्सिजनवरील रुग्णासाठी ऑक्सिजनच्या पुरवठय़ाबाबत परिचारिकेला दक्ष राहावे लागते. ऑक्सिजन पुरवठा तोंडाला मास्क लावून होतो. त्यात रुग्णाचा प्रतिसाद असतो. केवळ फु फ्फुसात योग्य प्रमाणात पुरवठा करण्याचीच काळजी असते. व्हेंटिलेटरमध्ये घशात व गळय़ात नळी टाकून पुरवठा होत असतो. पूर्णत: कृत्रिम व रुग्णास अनभिज्ञ असणारी ही प्रक्रिया आहे. फु फ्फुसासोबतच हृदयाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केल्या जाते. औषध शाखेचे तसेच भूलतज्ज्ञच ही बाब हाताळू शकतात. या तज्ज्ञांचीदेखील उणीव असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत असल्याचे चित्र आहे. व्हेंटिलेटरची सोय ही खर्चीकच बाब समजली जाते. एक व्हेंटिलेटर दर्जानुसार १० ते १५ लाख रुपये किंमतीत पडते. आजच पाच व्हेंटिलेटर सावंगी रुग्णालयाला उपलब्ध करून दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांनी सांगितले. सर्वाधिक व्हेंटिलेटर सुविधा असणाऱ्या सावंगीच्या शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयास परिचारिकांचा तुटवडा भासला. नव्या निकषानुसार तीन व्हेंटिलेटरमागे एक परिचारिका ठेवून जबाबदारी कसोशीने पार पाडल्या जात असल्याचे प्रशासकीय अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी सांगितले. विदर्भात सर्वाधिक करोना रुग्ण हाताळणारे आमचे खासगी रुग्णालय असून आवश्यक ते मनुष्यबळ अपुरेच ठरणार. चाळीस व्हेंटिलेटरच्या खाटा अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्या जात आहे. व्हेंटिलेटरची गरज असणारा नवा रुग्ण आला की लगेचच व्हेंटिलेटरच्या खाटेवरील रुग्ण हलवता येत नाही. म्हणून तक्रारीही उद्भवतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीच आता स्वत:बाबत दक्ष असण्याची गरत असल्याचे डॉ. मेघे म्हणाले.

चंद्रपूर शासकीय वैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमने यांची तडकाफडकी बदली

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमने यांची गुरुवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. कठीण काळात कर्तव्यात कसूर करीत कार्यालयात बसून काम करणे त्यांना भोवल्याची आरोग्य विभागात चर्चा आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असताना ही बदली झाल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. दरम्यान, डॉ. हुमने यांच्या जागेवर अजून कुणालाही नियुक्ती दिलेली नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांच्या बदलीनंतर अधिष्ठातापदी डॉ. अरुण हुमने यांची नियुक्ती करण्यात आली होती. करोना संक्रमण काळातच डॉ. मोरे यांची बदली झाली होती. त्यानंतर डॉ. हुमने यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरही आरोग्य विभागात कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. यापेक्षा डॉ. मोरे यांच्या कार्यकाळापेक्षाही सुस्त कारभार आरोग्य विभागाचा झाला. बाधितांची संख्या दररोज १ हजार ते १२०० रुग्णांपर्यंत गेली. एकूणच सर्व भोंगळ कारभार बघता पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अधिष्ठाता डॉ. हुमने यांच्यावर संताप व्यक्त केला. तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत कार्यप्रणालीत बदल झाला नाही तर बदली करण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही अधिष्ठाता डॉ. हुमने यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही. शेवटी अधिष्ठाता डॉ. हुमने यांच्या बदलीचे आदेश वैद्यक महाविद्यालयात पोहचले.

डेरा आंदोलन करणाऱ्या जवळपास ३५० कंत्राटी कामगारांचे पगार वैद्यक महाविद्यालयाला मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:44 am

Web Title: lack of qualified manpower for ventilator handling zws 70
Next Stories
1 करोना रुग्णांसाठी कलिंगडातून गुटखा, पार्सलमधून दारू
2 लोकसहभागातून प्राणवायू!
3 ‘मरकज’च्या धर्तीवर कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू
Just Now!
X