19 September 2020

News Flash

महिलांसाठी जीम उभारण्यास परभणी महापालिकेची मंजुरी

महिलांसाठी जीम उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

| August 27, 2015 01:56 am

महिलांसाठी जीम उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महिला दिनानिमित्त ८ मार्चला महिला मेळावा, तसेच दिवाळीनिमित्त महिला बचतगटाच्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन भरवण्याचेही ठरले.
महापौर संगीता वडकर यांच्या उपस्थितीत, तसेच महिला व बालकल्याण सभापती अश्विनी वाकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीस नगरसचिव चंद्रकांत पवार, विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, सदस्या तिरुमला खिल्लारे, आशा वायवळ, सुदामती थोरात आदींची उपस्थिती होती. महिला दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने महिला मेळावा घेण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी शेख अकबर यांनी दिली. दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात महिला बचतगट वस्तूंचे विक्रीप्रदर्शन भरवण्याची मागणी श्रीमती खिल्लारे, वायवळ व थोरात यांनी केली. ही मागणी मान्य करीत कल्याण मंडपम येथे प्रदर्शन भरवण्याचे वाकोडकर यांनी जाहीर केले. या बरोबरच स्वयंसेवी महिला प्रतिनिधींसाठी दोन दिवसांची कार्यशाळा घेऊन प्रोत्साहन अभियान राबविण्यात येणार आहे. महिलांसाठी योग प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
गांधी पार्क येथील उद्यानाचे प्रवेशद्वार खुले करावे, या परिसराची स्वच्छता करावी अशीही मागणी श्रीमती डहाळे यांनी केली. शववाहिनी खरेदी करण्याचे विभागप्रमुख मिर्झा बेग यांनी जाहीर केले. महिलांसाठी शहरात जीम उभारण्याची मागणी करताच २५ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. जागा उपलब्ध झाल्यानंतर या बाबत निर्णय घेतला जाईल. महिलांसाठी आयुर्वेदिक विषयावर व्याख्यान घेतले जाणार आहे, असेही सांगण्यात आले. बाळासाहेब पेंडलवार, भगवान िशदे, उदय चाऊस आदींची उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 1:56 am

Web Title: ladies gym sanction
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्वाचा आधार
2 गुजरातमध्ये पटेल एकत्र आले तसे महाराष्ट्रात पाटीलांनी एकत्र यावे- राणे
3 कोल्हापूरमधील टोलप्रश्न ‘जैसे थे’, समितीचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निर्णय
Just Now!
X