News Flash

महाबळेश्वर येथे वेण्णालेक जवळ गाडी खड्ड्यात कोसळून पुण्याची डॉक्टर महिला जखमी

रात्री एका ढाब्यावर जेवण करून वेण्णा लेक मार्गे त्या महाबळेश्वर कडे जात असताना हा अपघात झाला.

वाई:महाबळेश्वर येथील वेण्णालेक रस्त्यावर प्रतापसिंह उद्यानाजवळ सात ते आठ फूट खोल खड्ड्यात गाडी कोसळून पुणे येथील भुलतज्ज्ञ डॉ. रिमा मनोहर बोधे (वय ३२) या डोक्याला मार लागून जखमी झाल्या आहेत.  स्थानिक युवकांनी कारमधील दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

महाबळेश्वर वाई रस्त्यावर रात्री एका ढाब्यावर जेवण करून वेण्णा लेक मार्गे त्या महाबळेश्वर कडे जात असताना हा अपघात झाला.

येथून मध्यरात्री एक वाजता नोबिन खान व मुस्तकिन बागवान हे दोघे वाईकडे निघाले होते. प्रतापसिंह उद्यानाजवळ येताच त्यांना महीलेचा ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज आल्याने ते थांबले. त्या वेळी कार खड्ड्यात कोसळली होती. त्या कारमधील महिला जखमी झाली होती. स्थानिक युवकांनी कारमधील जखमींना बाहेर काढून ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.

रिमा ह्या  महाबळेश्वरला सहलीसाठी आल्या होत्या. साडेबाराच्या सुमारास त्यांची गाडी प्रतापसिंह उद्यानाजवळ आली. त्यावेळी हलका पाऊस पडत होता. रस्त्यावर प्रचंड धुके पसरले होते. रस्त्यावर स्ट्रीट लाईट देखील बंद होत्या. त्यामुळे वाहनचालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावरून खोल खड्ड्यात कोसळली.त्यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 11:58 pm

Web Title: lady doctor accident from pune injured in accident in mahabaleshwar zws 70
Next Stories
1 आठ तास गाडी चालवून पंढरपूरला पोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली करोना आढावा बैठक
2 हे राज्यपालांचं कर्तव्य नाही का?; १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन उच्च न्यायालयाचा सवाल!
3 दिलासादायक : राज्यात दिवसभरातील करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक करोनामुक्त!
Just Now!
X