News Flash

डॉक्टर महिलेचे साडेआठ लाखांचे दागिने बसमधून चोरीस

डॉक्टर महिलेची साडेआठ लाख रुपयांचे दागिने  असलेली बॅग अज्ञात चोरटय़ांनी एसटीमधून लंपास केली.

(संग्रहित छायाचित्र)

कर्जत : पुण्याहून बीडला जात असताना डॉक्टर महिलेची साडेआठ लाख रुपयांचे दागिने  असलेली बॅग अज्ञात चोरटय़ांनी एसटीमधून लंपास केली. या प्रकरणी पाटोदा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करून झिरो एफआयआरने जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा आला आहे.

शुक्रवारी दि. १८ रोजी पुणे येथील डॉ क्षितिजा घनवट या बीडला आईवडिलांकडे येत होत्या. त्यांच्यासोबत सासरे पांडुरंग घनवट होते. पुणे-बीड शिवशाही बसने प्रवास करत असताना बस जामखेड येथे नादुरुस्त झाली, त्यामुळे ते जामखेड येथून बीडकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये बसले. गर्दी असल्याने डॉ. क्षितिजा या वाहकाच्या आसनावर बसल्या. सोबतच्या बॅगा मागील आसनावर ठेवल्या. दरम्यान, क्षितिजा यांचे वडील मदन शिंदे हे त्यांना घेण्यासाठी चुंबळी फाटा येथे येणार असल्याने दोघे तेथे उतरले. त्या ठिकाणी एका सहप्रवासी महिलेने त्यांच्या बॅगा गाडीतील दुसऱ्या महिलेने उघडल्याचे सांगितले. घनवट यांनी तपासणी केली असता बॅगमधील साडेआठ लाख रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर घनवट यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. हद्दीचे कारण पुढे करत त्यांना जामखेड पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला.  डॉ. क्षितिजा यांनी दिल्ली येथे असलेल्या पती डॉ. श्रीकांत घनवट यांना हा सर्व प्रकार कळवला. त्यांनी नगर व नांदेड येथील पोलीस अधीक्षक यांनाही कळवले. बीड पोलीस अधीक्षक उपलब्ध नसल्याने नांदेड पोलीस अधीक्षकांनी थेट पाटोदा पोलीस निरीक्षकांना सुनावले. त्यानंतर पाटोदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून जामखेड पोलीस स्टेशनकडे वर्ग केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 12:36 am

Web Title: lady doctor jewelery worth rs 8 lakh stolen from bus
Next Stories
1 शेतकऱ्यांची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे
2 हे सरकार आहे की भिताड – अजित पवार
3 गोडसेने एक महात्मा संपवला आणि मोदी लोकशाही संपवून ठोकशाही आणत आहेत – छगन भुजबळ
Just Now!
X