News Flash

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन

मालिका विश्वावर पसरली शोककळा

लागिरं झालं जी या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ऐन दिवाळीत त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल ठोके यांची ओळख होती. १४ नोव्हेंबरला बंगळुरू या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध मालिका लागिरं झालं जीमधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरु या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षकी पेशा सांभाळात अभिनय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका होत्या. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे. लागिरं झालं जी या मालिकेतून त्या घराघरात पोहचल्या होत्या. जिजी या नावानेच त्या परिचितही झाल्या होत्या. देवमाणूस या मालिकेतही त्या काम करत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 7:59 am

Web Title: lagir zhal ji serial fame veteran actress kamal thoke passes away scj 81
Next Stories
1 गड किल्लय़ांचे दरवाजे पर्यटकांसांठी खुले
2 कोयता घेऊन ऊसतोडणीला जाणारे गाव ऊस पिकवू लागले
3 हिंगोलीतील जलसंधारणाच्या ६३ कामांवरील स्थगिती उठवली
Just Now!
X