लिंगबदल शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर नवीन ओळख मिळवलेल्याा बीड जिल्ह्यातील पोलीस शिपाई ललित साळवेंचं त्यांच्या जन्मगावी जंगी स्वागत झालं. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ललितला दोन दिवसांपूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ललित साळवे आपल्या गावी परतले. ललित यांचं मुळगाव असलेल्या राजेगाव येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१० मध्ये साळवे महाराष्ट्र पोलीस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाले होते. साळवेंची लहानपणापासून मुलगी म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्यामध्ये मुलाचे हार्मोन्स असल्याने वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत, असे वाटत होते.अखेर वर्षभरापूर्वी त्यांनी पोलीस खात्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली होती. महिला असून पुरुष असल्याचा त्यांच्या या अजब दाव्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांचा लढा सुरू होता. अखेर त्यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात यशस्वी  लिंगबदल शस्त्रक्रिया पार पडली.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर व त्यांच्या चमूने टप्प्या टप्प्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये अशी शस्त्रक्रिया प्रथमच झाली. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ‘माझी घुसमट आता कमी झाली, मी आता खुलेपणानं जगू शकते. माझ्यावरचं स्त्री म्हणून वावरण्याचं दडपण कमी झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit salve villager celebrate homecoming of maharashtra cop who underwent his first sex change surgery
First published on: 14-06-2018 at 12:50 IST