राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला अभिषेक आणि कालसर्प पूजा केली. त्यांच्यासोबत पत्नी राबडीदेवी, दोन मुले आणि मुलगी देखील यावेळी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वरमधील मंदिरात बुधवारी सकाळी यादव कुटुंबीयांचे आगमन झाले. सर्व पूजा आटोपल्यानंतर ते संध्याकाळी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. महाराजगंजमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार प्रभूनाथ सिंग यांनी संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 6:20 am