20 September 2018

News Flash

महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प रखडण्याची चिन्हे, एक एकर जमिनीचंही अधिग्रहण नाही

हजारो शेतकऱ्यांनी या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करताना जमिनी देण्यास नकार दिला असल्याचं संदेश देसाई या स्थानिक शेतकऱ्यानं रॉयटर्सला सांगितलं

नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

रत्नागिरी जिल्ह्यातल्या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा नाणार प्रकल्पाला स्थानिकांच्या विरोधाचं ग्रहण लागलं असून हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालल्याचं अंदाज रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं वर्तवला आहे. सौदी अरामको या जगातल्या आघाडीच्या तेल उत्पादक कंपनीबरोबर 44 अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प उभारण्याचा करार नुकताच करण्यात आला. भारताच्या पेट्रोलजन्य पदार्थांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी अत्यावश्यक तसेच स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगार मिळवून देणारा असं वर्णन सरकारनं या प्रकल्पाचं केलं होतं. परंतु तब्बल 15 हजार एकर जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक असून आत्तापर्यंत एक एकर जमिनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही.

HOT DEALS
  • Jivi Energy E12 8 GB (White)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%
  • Moto C Plus 16 GB 2 GB Starry Black
    ₹ 7999 MRP ₹ 7999 -0%

हजारो शेतकऱ्यांनी या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करताना जमिनी देण्यास नकार दिला असल्याचं संदेश देसाई या स्थानिक शेतकऱ्यानं रॉयटर्सला सांगितलं. रत्नागिरी भोवतालच्या 14 गावांमधील शेतकऱ्यांनी या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला देसाईंप्रमाणेच ठाम विरोध केल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं रॉयटर्सनं म्हटलं आहे. प्रकल्प तडीस न्यायचा असेल या गावातल्या लोकांचं स्थलांतर करावं लागणार आहे.

विरोधी पक्षांनी, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यामुळेही हा प्रश्न किचकट बनला आहे. या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 15 हजार एकर जमिनीची आवश्यकता असून राज्य सरकारला अद्याप एक एकर जमिनही हस्तांतरित करता आली नसल्याचे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. जमिन अधिग्रहण कायद्यानुसार 70 टक्के जमिनधारकांची प्रकल्पाला संमती असावी लागते. आणि बहुसंख्य शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असल्यामुळे राज्य सरकार जमिन ताब्यात घेऊ शकणार नाही असं देसाई म्हणाले आहेत. परिणामी राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

First Published on May 17, 2018 3:02 pm

Web Title: land acquisition major concern for nanar refinery project