05 March 2021

News Flash

महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यटन स्थळं खुली होताच मोठी गर्दी

दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली

वाई:मागील आठ महिन्यापासून करोना प्रदुर्भावामुळे व टाळेबंदीच्या विळख्यात घरातच अडकलेल्या नागरिकांनी दिवाळीची संधी साधत महाबळेश्वर पाचगणी ही पर्यटनस्थळे सर्वांसाठी खुली करताच मोठी गर्दी केली आहे. घरातून सुटका झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

थंड हवेचे ठिकाण व राज्याचे कौटुंबिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी परिसर पर्यटकांनी बहरला असून करोना संसर्गाचे काटेकोर पालन करण्याचा दोन्ही पालिकांचा प्रयत्न आहे.महाबळेश्वर पाचगणी शहरे करोनामुक्त झाल्याचे पालिकांनी जाहीर केले आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.यंदा दिवाळीच्या सुट्यांनाच जोडून वीकेण्ड आल्याने पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ झाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या हॉटेल्सचे आरक्षण फुल्ल झाले आहे. साधारणत: २५ नोव्हेंबर पर्यन्त पर्यटकांच्या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.पर्यटन सुरु झाल्याने आर्थिक चणचण कमी होईल .रोजदारी व छोटे मोठे हातावरचे उद्योग सुरु झाल्याने स्थानिकांसह हॉटेल चालकांमध्ये उत्साह आहे.

दिवाळी सुरू होण्यापूर्वीच पाचगणी व महाबळेश्वरमधील व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने हिवाळी हंगामासाठी सज्ज केली होती. रंगरंगोटी, दुकानांची डागडुजी करुन नवनवीन वस्तू दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही शहरातील हॉटेल व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आले असून येथील हॉटेलच्या सर्व रूम बुक झाल्या आहेत. त्यामुळे कोणतेही नियोजन न करता पर्यटनाला येणा-या नागरिकांना मात्र कसरत करावी लागत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर बोटिंगसाठी सर्वाधिक गर्दी होत असून, हॉर्स रायडिंगलाही पर्यटक पसंती देत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, व्यापारी व नागरिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असताना येथील स्थानिक प्रशासन व व्यापारी काटेकोर झाले असून नियमांची सक्त अमलबजावणी सुरु आहे. दोन्ही शहरांतील पर्यटनस्थळांकडे जाणा-या रस्त्यांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे. दरम्यान, येथे येणारे पर्यटक आपापल्या गाड्यांमधून येत आहेत.

वाहनांच्या वाढत्या गर्दीने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ठिकठिकाणी अनुभवायला यासाठी पोलीस प्रशासन सक्त आहे.लालचुटूक स्ट्रॉबेरी चाखत पर्यटक पाचगणी- महाबळेश्वरात दिवाळी सुटीचा आनंद लुटताहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 3:16 pm

Web Title: large crowd as soon as the tourist spots in mahabaleshwar pachgani open scj 81
Next Stories
1 अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर खुले; भाविकांमध्ये आनंद
2 “बिहारमध्ये आम्ही शब्द दिला आणि तो पाळला, महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द दिलाच नव्हता”
3 …म्हणून परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे – नितेश राणे
Just Now!
X