अधिक महिन्याच्या एकादशीमुळे पंढरीत भाविकांची गर्दी

पंढरपूर : अधिक महिन्याच्या एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यासह कर्नाटक,आंध्र प्रदेशातून भाविक मोठय़ा श्रध्येने श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले आहेत. मंदिर समितीने भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावे म्हणून उपाययोजना केल्या आहेत. एकादशीनिमित्त पुण्यातील भाविकाने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास फुलांनी आरास केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Surya Grahan 2024
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीआधी ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात सोन्यासारखं चमकू शकतं भाग्य
pune farmers marathi news, pune holi farmers marathi news, farmers disappointed on holi marathi news
शेतकऱ्यांची निराशा! होळीच्या मुहूर्तावर बेदाणा, गुळाच्या दराचे काय झाले?

यंदाच्या वर्षी अधिक अर्थात पुरषोत्तम मास आला आहे. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. तर वारकरी सांप्रदायात अधिक मासात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेणे याला महत्त्व आहे. या महिन्याच्या एकादशी निमित्त राज्यासह परराज्यातून भाविक येथे दाखल झाले आहेत. एकादशीला चंद्रभागा नदीत स्नान, नगरप्रदक्षिणा आणि सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यास भाविक दर्शन रांगेत उभा होता. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शनासाठी साधारणत: ६ ते ७ तास लागत आहेत. या दर्शन रांगेत ऊन, वारा, पाऊ स याचा त्रास होऊ  नये म्हणून समितीने विशेष दक्षता घेतली असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. तसेच, दर्शन रांगेत पिण्याच्या  पाण्याची सोय समितीने उपलब्ध केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मंदिर  समिती, पालिका प्रशासनाने भाविकांसाठी सोयी सुविधा देण्यास विशेष प्रयत्न केलेले दिसून आले आहे. तसेच शहरात वाहतूक व्यवस्था तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ  नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकादशी निमित्त पुण्यातील भाविक राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आकर्षक फु लांनी सजविलेआहे. पंढरी  नगरी टाळ,मृदंगाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे.