30 March 2020

News Flash

लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू

सहा दिवसांपासून सुरू होती मृत्यूशी झुंज

प्रतिनिधिक छायाचित्र

लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झाला. सहा दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मुंबईच्या मसिना रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.  अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही पीडिता गंभीररीत्या भाजली होती.

मुंबईतील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  शवविच्छेदनानंतर  तिचा मृतदेह अंत्य संस्कारासाठी लासलगावला नेला जाणार आहे.

लासलगाव येथील बस स्थानकावर १५ फेब्रुवारी झालेल्या वादानंतर ही महिला भाजली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोलपंप व्यवस्थापक व कर्मचारी आकाश शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी रामेश्वर भागवतला निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, आकाश शिंदेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला  आहे. तर पेट्रोलपंप व्यवस्थापकास अद्यापही अटक केलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 7:50 am

Web Title: lasalgaon jallikanda victims death msr 87
Next Stories
1 नेर धामना प्रकल्पात कोटय़वधींचा गैरव्यवहार
2 पाच वर्षांत सहा हजारांवर शेतकऱ्यांची आत्महत्या
3 मागील कामांच्या चौकशा करा, मात्र निर्णय अहवाल लवकर द्या – चंद्रकांत पाटील
Just Now!
X