हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेले आ. गोविंद राठोड यांच्या पाíथवावर आज मुखेड तालुक्यातल्या कमळेवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी देवगिरी एक्सप्रेसने मुंबईला जाताना आ. गोिवद राठोड यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मुखेडसारख्या डोंगराळ भागातील वसंतनगर येथील रहिवासी असलेले गोिवद राठोड यांनी नुकताच भाजपात प्रवेश घेऊन निवडणुकीत मोठय़ा मतांच्या फरकाने विजय  मिळविला. भाजपाच्या बठकीसाठी मुंबईकडे जाताना त्यांचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यावर शोककळा पसरली. उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सकाळी त्यांचे पाíथव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मुखेडच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील जनसागरच कमळेवाडीत लोटला होता. गोविंदमामा या नावाने ते परिचित होते.
कमळेवाडी येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. विकास राठोड यांनी त्यांच्या पाíथवाला अग्नी दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अंत्यसंस्काराला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडणवीस, आ. पंकजाताई मुंडे, आ. राम िशदे, आ. प्रभू चव्हाण (कर्नाटक), आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. वसंतराव चव्हाण, आ. प्रदीप नाईक, आ. विक्रम काळे, आ. सुभाष साबणे, माजी आ. डॉ. माधवराव किन्हाळकर, रोहिदास चव्हाण, गोिवद केंद्रे, मनोहर पटवारी, बापूसाहेब गोरठेकर, पुरुषोत्तम धोंडगे, जि. प. चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, राजेश पवार, नागोराव कुंभार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी खा. डी. बी. पाटील, देविदास राठोड, भाजपाचे चतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, माधवराव पाटील जवळगावकर, मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, जि. प. चे सभापती स्वप्नील चव्हाण, बळवंत पाटील बेटमोगरेकर, बालाजी अंबुलगेकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, नामदेव जाहूरकर यांच्यासह सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून आ. राठोड यांना मानवंदना देण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडणवीस म्हणाले आ. राठोड यांचे निधन मला व्यक्तिश: धक्का देणारे आहे. लोकनेता अशी ओळख असलेल्या आ. राठोड यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा राहील. त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे ते म्हणाले.
राजकारणात सडेतोड भूमिका मांडण्यासाठी परिचीत असलेल्या आमदार गोिवद राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक वादळी व निर्मळ व्यक्तिमत्त्व हरवल्याची सार्वत्रिक भावना आहे. केवळ भाजपाच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांसह सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले.
७ जून १९४२ ला जन्मलेल्या गोिवद राठोड यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय राहिले. राजकारणात असूनही त्यांनी संपूर्ण हयातीत सडेतोड भूमिका घेतली. तब्बल ७६ हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदासाठी शब्द देण्यात आला होता. भाजपच्या १२३ आमदारांमध्ये बंजारा समाजाचे ते एकमेव होते. सुरुवातीच्या काळात कै. शंकरराव चव्हाण यांच्या समवेत राजकारण करणाऱ्या आ. गोिवद राठोड यांची मुखेड नगर परिषदेवर गेल्या ४० वर्षांपासून एकहाती सत्ता होती.
एकेकाळी काँग्रेसला बळ देण्याचे काम राठोड परिवाराने केले. ते आम्ही विसरू शकत नाही. त्यात गोिवदरावांचा मोठा वाटा होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष बदलला पण त्यांचे नेतृत्व लोकांनी स्वीकारले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात अशोकराव चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.