02 March 2021

News Flash

आईकडून एनओसी आणाल तरच डीजेसाठी परवानगी: जिल्हाधिकारी

घरातील टीव्हीचा आवाज थोडा जरी वाढवला की आई किंवा बहीण आवाज कमी करायला सांगते. आपल्या जवळची लोक जास्त काळजी घेतात.

कस्तुराई मंगल कार्यालयात लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवातील डीजेमुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधताना लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना डीजे. घरातील टीव्हीचा आवाज थोडा जरी वाढवला की आई किंवा बहीण आवाज कमी करायला सांगते. आपल्या जवळची लोक जास्त काळजी घेतात. त्यामुळे गणेशोत्सवातील डीजेसाठी आई किंवा बहिणीची एनओसी आणणाऱ्यांना परवानगी देऊ. पण तुम्हाला घरातूनच अशी एनओसी मिळणार नाही याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.

कस्तुराई मंगल कार्यालयात लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर खा. डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी जी. शीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, जि. प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार उपस्थित होते.

जी. श्रीकांत म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात ज्यांना डीजे लावायची इच्छा आहे, त्यांनी पालकमंत्री, आमदार, महापौर, पोलीस अधीक्षक अशा कोणाचेही पत्र आणू नका. फक्त तुमच्या आईचे व बहिणीचे पत्र आणा. मी स्वतः तुम्हाला परवानगी देतो, अशी गुगलीच त्यांनी टाकली. प्रत्येकाच्या घरातील आई व बहीण ही सर्वाधिक काळजी करणारे असतात. घरात टीव्हीचा आवाज थोडा मोठा झाला तरी तो कमी करण्याची सूचना याच पहिल्यांदा देतात त्यामुळे डीजे लावून आवाजाचा गोंगाट करण्यास त्या परवानगी देणार नाहीत याची आपल्याला खात्री असल्यामुळे त्यांचे शिफारसपत्र आणा असे मी आपल्याला सांगत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी आधी लातूर जिल्हा हा ९० टक्के डीजेमुक्त होता. यावर्षी तो शंभर टक्के झाला पाहिजे. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जी गणेश मंडळे आम्ही डीजे लावणार नाही असे हमीपत्र देतील त्यांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर गणेशोत्सव हा सणच सामाजिक बांधिलकी व सलोख्याचा आहे. तो डीजेमुक्त व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यावर्षी गणेशोत्वाच्या निमित्ताने पाणी व वृक्ष संगोपन या विषयावर जनजागरण व्हायला हवे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 4:31 pm

Web Title: latur ganesh mandal police meeting collector says get noc from mother for dj
Next Stories
1 …म्हणून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला लोकलने प्रवास
2 सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ
3 पेट्रोल, डिझेल महागले: जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर
Just Now!
X