News Flash

अकलूजकरांचा लातूरकरांना पाणीपुरवठय़ाद्वारे मदतीचा हात

अकलूज येथील शिवामृत सहकारी दूध संघाचा टँकर दररोज नांदेड येथील दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जातो.

सध्याच्या दुष्काळाच्या झळा सर्वत्रच जाणवत असताना त्यात लातूरसारख्या भागात दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक प्रमाणात असल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे सभागृहनेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन लातूरकरांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

अकलूज येथील शिवामृत सहकारी दूध संघाचा टँकर दररोज नांदेड येथील दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जातो. हा टँकर नांदेड येथून माघारी येताना रिकामा असतो. लातूरमार्गे अकलूज येथे परत येणारा हा टँकर रिकामा न येता नांदेड येथून पाणी भरून तो लातूरला देण्यात यावा, अशी सूचना शिवामृत दूध संघाचे कुटुंबप्रमुख खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली होती. त्यानुसार प्रशासकीय मान्यतेचा सोपस्कार पूर्ण करून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दररोज दोन टँकरद्वारे लातूर येथे पाणीपुरवठा सुरू केला आहे. १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाच्या संकटात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनीही दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदतकार्य केले होते. तोच वारसा त्यांचे नातू धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपल्या कृतीतून जपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 1:28 am

Web Title: latur get water from akluj district
टॅग : Latur
Next Stories
1 साटमवाडी ग्रामविकास मंडळाचा रौप्यमहोत्सव संपन्न
2 माध्यमे व्यावसायिक झाल्याने निधर्मीवादी अधिक अडचणीत
3 महामार्ग ठप्प
Just Now!
X