News Flash

आतषबाजीचा ‘लातूर पॅटर्न’!

दिवंगत नेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे, तसेच सध्याचे उद्योगमंत्री नारायण राणे या नेत्यांच्या उपस्थितीत चार वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात रंगलेली राजकीय आतषबाजी अजूनही चांगली स्मरणात

| September 4, 2014 01:50 am

दिवंगत नेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे, तसेच सध्याचे उद्योगमंत्री नारायण राणे या नेत्यांच्या उपस्थितीत चार वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात रंगलेली राजकीय आतषबाजी अजूनही चांगली स्मरणात आहे. राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख व भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातही उपस्थितांना राजकीय करमणुकीचा पुनप्र्रत्यय घडला.
‘भाजप व काँग्रेस विकासरथाची दोन चाके आहेत’ असे धक्कादायक व अतक्र्य वक्तव्य आमदार दिलीपराव देशमुख यांनी या वेळी केले. मात्र, या निमित्ताने प्रथमच भाजपचे चाक विकासाच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी मान्य केले व या चाकासोबत काँग्रेसचे चाकही जोडून ही दोन्ही चाके विकासाच्या रथाला जुंपली असल्याचे त्यांनी म्हटले. परंतु हे वक्तव्य त्यांनी सरधोपट म्हणून केले, की गांभीर्यपूर्वक वा पुढील राजकारणाची दिशा यातून स्पष्ट केली, याचा बोध मात्र कोणालाही झाला नाही.
खासदार गायकवाड यांना चिमटे काढताना आमदार देशमुख यांनी, खासदार पक्षीय अभिनिवेश सोडून सहजतेने वावरतात. केंद्रातील कामांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. अल्पसंख्य विभागाचा २५ कोटींच्या प्रस्तावाचा पाठपुरावा त्यांनी करावा. केंद्राला आचारसंहिता लागू नाही, अशी पुस्ती जोडली. लातूर देशातील टॉप टेनपकी असेल, लातूरचे सिंगापूर करू, अशा घोषणा देशमुखांनीच पूर्वी केल्याचे लातूरकरांच्या चांगले लक्षात आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीची घोषणा केली. शंभर शहरे उभी राहतील तेव्हा राहतील. पण स्वबळावर १०१ वे शहर म्हणून लातूर उभे राहात आहे, असा दावाही त्यांनी केला.
लातूर महापालिकेत काँग्रेसचे निर्विवाद बहुमत आहे. ७० पकी ५० नगरसेवक एकटय़ा काँग्रेसचे आहेत. गेल्या २ वर्षांपासून नगरसेवक सर्वसाधारण सभेत भांडणे करीत. एकमेकांच्या अंगावर धावून जात. आपल्याच नगरसेवकांचे जाहीर िधडवडे देशमुखांनी भाषणात काढले. गेली २ वष्रे महापालिकेत बिनपशाच्या सभा होत होत्या. त्यामुळे रिकाम्या भांडय़ांचा आवाज होत होता. आता ३०० कोटींची कामे मंजूर होऊन निधीही प्राप्त झाला. त्यामुळे भरलेल्या भांडय़ांचा आवाज आता येणार नाही, हे वक्तव्य केल्यानंतर त्यांना यातील गोम कळली व त्याच ठिकाणी आपल्याच वक्तव्यावर ‘मला कोणाची खिल्ली उडवायची नाही, आमची लातूरची टीम चांगली आहे. राजकारणात प्रसंगी आपल्याच कार्यकर्त्यांना समज द्यावी लागते,’ असा जाहीर खुलासा त्यांना करावा लागला. अर्थात, जाहीर कार्यक्रमात तो करण्यामुळे त्याचा नेमका लाभ काय होणार, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले.
आमदार देशमुख यांची कसलेले, मुरब्बी, निष्णात व अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख. शिवराज पाटील चाकूरकरांचा बौद्धिक वारसा चालवणारे अशीही ख्याती. परंतु मनपाच्या विविध कामांच्या भूमिपूजनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्यातून राजकीय करमणूक नाटय़ाचा दुसरा भाग मात्र लातूरकरांनी अनुभवला. राज्यमंत्री देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर खासदार गायकवाड आवर्जून उपस्थित होते. दरम्यान, निवडणुकीपूर्वी उद्घाटने, भूमिपूजन अशा प्रचारकी थाटाच्या कार्यक्रमांना आघाडीतीलच राष्ट्रवादीची मंडळी मात्र व्यासपीठावर जाण्याचे टाळतात. मनपात एकही नगरसेवक नसणारे भाजप खासदार गायकवाड मात्र एकही निमंत्रण टाळत नाहीत. गायकवाड यांना राजकीय भाषणाची सवय नसली, तरी लातूरच्या विकासासाठी मी सोबत आहे. त्यात पक्षीय राजकारण आणणार नाही. अमित देशमुखांनी राज्यातील निधी विकासासाठी आणावा. मी केंद्रातील निधी आणेन. विकासासाठी आपण निकोप स्पर्धा करू, असे मात्र ते बोलून गेले.
हा धागा पकडत मंत्री देशमुख यांनी खासदार विकासात राजकारण आडवे आणत नाहीत. केंद्रातील निधी लातूरसाठी आणतीलच. राज्यातील निधीची जबाबदारी माझ्यावर दिली. विधानसभा निवडणुकीनंतरही ती माझ्यावरच राहावी, या साठी त्यांनी सहकार्य करावे, असा टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 1:50 am

Web Title: latur pattern
टॅग : Latur,Latur Pattern
Next Stories
1 शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांची हत्या
2 चंद्रपुरात अवैध होडिर्ंग्जच्या गजबजाटाने शहर विद्रुप
3 चंद्रपूर जिल्ह्य़ात कॉंग्रेसच्या निष्ठावंत डावलून उपऱ्यांना मात्र शिफारसपत्रे
Just Now!
X