बार कौन्सिल ऑफ इंडिया, राज्य शासनाचे नियम शिथील

बार कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनाने नियम शिथील करून राज्यातील सर्व १२७ विधी महाविद्यालयांना यंदा प्रवेशासाठी परवानगी दिली आहे, त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार उद्यापासून विधी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन २६ सप्टेंबपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
girl kidnap viman nagar
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

सामायिक प्रवेश परीक्षेमुळे यंदा राज्यातील सर्वच १२७ विधी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया चांगलीच लांबली. अशातच बार कौिन्सल ऑफ इंडियाने चार रंगांची विधी महाविद्यालयांची यादी जाहीर केली. त्यानुसार राज्यातील १२७ पैकी ४० विधी महाविद्यालयांना लाल यादीत स्थान दिले, तर बहुतांश विधी महाविद्यालयांना पांढऱ्या, केसरी आणि हिरव्या यादीत स्थान दिले. पांढऱ्या यादीतील विधी महाविद्यालयांना प्रवेशाची मंजुरी देण्यात आली, तर केसरी यादीतील महाविद्यालयांना बार कौन्सिलची व लाल यादीतील महाविद्यालयांना राज्य शासन व बार कौन्सिल दोन्हीची परवानगी अनिवार्य केली. हिरव्या यादीतील महाविद्यालयांचा प्रवेश विचाराधीन ठेवला होता. परिणामी, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या या निर्णयाविरोधात मुंबईतील काही विधी महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे सदस्य सतीश देशमुख यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिध्दीला देत ही चार रंगात जाहीर केलेली महाविद्यालयांची यादी मागे घेतली आहे. या पत्रानुसार, बार कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनाने विधी महाविद्यालयांना २०१६-१७ च्या प्रवेशासाठी लागू केलेले नियम यंदासाठी काही प्रमाणात शिथील केले आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्व १२७ विधी महाविद्यालयांचा समावेश पांढऱ्या यादीत करण्यात आला आहे.

आता सर्व विधी महाविद्यालये पांढऱ्या यादीत आल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता राज्य शासन राज्यातील सर्व १२७ विधी महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. याच वेळी पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विधी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियेला सुरू होईल. विशेष म्हणजे, राज्य शासनाने विधी महाविद्यालयात प्रवेशासाठीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार उद्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. त्यानंतर दुसरी फेरी २० सप्टेंबरला, तर ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया २६ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. २६ सप्टेंबरलाच प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यंदा प्रथमच विधी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया इतकी लांबल्यामुळे राज्यातील विधी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांना केवळ बार कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनामुळेच त्रास सहन करावा लागला आहे. आताही राज्य शासन आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया एकमेकांकडे बोट दाखवित आहे. त्याचा परिणाम यंदा विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे, तसेच खासगी महाविद्यालयांचे कधीही भरून न निघणार नुकसान झाले आहे.

रविवारच्याही सुटय़ा रद्द

राज्यातील विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असल्याने सर्व १२७ विधी महाविद्यालयांच्या सुटय़ा रद्द करण्यात आलेल्या आहेत. उद्या  प्रवेशाचा पहिला दिवस असल्याने आणि उद्याच बकरी ईद आहे. मात्र, उद्याची विधी महाविद्यालयाची सुटी शासनाने रद्द केली आहे, तसेच २६ सप्टेंबपर्यंतच्या रविवारच्याही सुटय़ा रद्द केलेल्या आहेत. सुटीच्या दिवशीही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.