News Flash

‘ही’ परीक्षा घरूनच द्या… आता लर्निंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही

लर्निंग लायसन्ससाठी घेतली जाणारी परीक्षा घरूनच देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. तसे आदेशही आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत.

लर्निंग लायसन्ससाठी घेतली जाणारी परीक्षा घरूनच देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. तसे आदेशही आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

करोनामुळे कार्यालये बंद असल्याने आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्याने अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोध महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसे आदेश राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली. लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओकडून परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिलं जातं. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. करोना लॉकडाउनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

राज्यातील ५० आरटीओ कार्यालयाना आदेश

राज्यात आता लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. “परिवहन विभागाने राज्यातील ५० आरटीओ कार्यालयाना मंगळवारी तसे आदेश दिले आहेत. या सुविधेमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार आहे. कार्यालयात होणार गर्दी कमी होणार असून, दलाली संपेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांच्या वेळेत व खर्चात बसत होईल,” असं ढाकणे म्हणाले. ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात परिवहन विभाग वर्षाला २० लाख लर्निंग लायसन्स वितरित करतो. इतक्याच संख्येनं कार आणि दुचाकीची नोंदणी केली जाते. लायसन्स आणि वाहन नोंदणी करण्यासाठी देशभरात एनआयसी आणि सारथी या दोन्ही संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात आलेले असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

या निर्णयामुळे काय फायदा होणार?

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे त्यात माहिती भरावी लागते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून वेळ उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेची तारीख कधी लवकर मिळते, तर कधी महिनाभर वाट बघावी लागते. मात्र, नव्या सुविधेमुळे यात बदल होणार आहे. घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थीकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध सारथी सेवेत प्रवेश करताच परवाना पर्याय उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक नमूद केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 8:34 am

Web Title: learning licence test online test from home learning licence test aspirants take online test from home maharashtra rto offices bmh 90
Next Stories
1 “संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”
2 Coronavirus : तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी केली? लोकल कधी सुरु होणार?; आदित्य ठाकरेंनी दिली उत्तरं
3 सांगलीत कृष्णा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
Just Now!
X