News Flash

एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचे सदस्यत्व रद्द होणार

मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.

कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणारया मच्छीमार नौकाविरोधात कारवाईचा फास आवळला जाणार आहे. एलईडी लाईटचा वापर करणारया नौकां आणि त्यांना सहकार्य करणारया मच्छीमार संस्थावर कारवाई केली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.

रात्रीच्या वेळी खोल समुद्रात मासमारी करतांना एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लाईटमुळे आकर्षति होऊन मासे जाळ्यात अलगद सापडत असत. मात्र यामुळे लहानमोठ्या सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे खोलसमुद्रात मासेमारी करताना एलईडी लाईटचा वापर करण्यास र्निबध घालावेत अशी माणगी रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांनी केली होती.

पुर्वी १२ सागरी मलापासून पुढे काही अटी आणि शर्तीवर एलईडी मासेमारीला परवानगी देण्यात आली होती. आता मात्र देशभरातील कुठल्याच किनारयांवर आता एलईडी लाईट्सच्या साह्याने मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. १० नोव्हेंबर २०१७ ला याबाबतचे एक परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले होते. मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दलाला अशा बोटींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र या र्निबधानंतरही कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटच्या साह्याने मासेमारी सुरुच होती. हिबाब लक्षात घेऊन आता अशा मासेमारी नौकांचे सभासदत्व रद्द करण्याचे निर्देश आता मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. कायदेशीर कारवाई बरोबरच आता अशा नौकांवर प्रशासकीय कारवाईला सामोर जावे लागणार आहे. त्याचबरोबर ज्या मच्छीमार संस्था एलईडी लाईटचा वापर करणारया मच्छीमारांना संरक्षण देतील, त्या मच्छीमार संस्थेला शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णयही मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे.

एलईडी मासेमारी पध्दतीमुळे समुद्रातील माश्यांचे प्रमाण कमी होईल त्याचबरोबर संपूर्ण सागरी जैवविविधताच धोक्यात येईल अशी भिती व्यक्त केली जात होती. भरमसाठ मासेमारीमुळे समुद्रातील लहान मोठ्या मत्स्यप्रजाती सरसकट नष्ट होण्याची भिती आहे. कोकण किनारपट्टीवर पुर्वी आढळणारया अनेक मत्स्यप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशात एलईडीचा वापर सुरु राहिल्यास आणखिनही काही मत्स्यप्रजाती कायमच्या नष्ट होऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 3:47 am

Web Title: led fishers boat membership will be cancelled konkan coastal
Next Stories
1 मिरचीचा ‘ठसका’!
2 फ्रान्समधील कंपनीच्या पुनर्रचनेमुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा पेच
3 विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पंढरीत रंगला
Just Now!
X