04 July 2020

News Flash

पौराणिक दशावतार नाटय़स्पर्धेत ‘कृष्णलीला’ प्रथम

या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे राजपात्र, स्त्रीपात्र, खलनायक, नारद, विनोदी पात्रे अशी ठेवण्यात आली होती.

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गने आयोजित केलेल्या ट्रिकसिन पौराणिक दशावतार नाटय़ स्पर्धेत जय हनुमान दशावतार नाटय़ मंडळ आरोसच्या ‘कृष्णलीला’ नाटकास प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेत दुसरा क्रमांक चेंदवणकर गोरे दशावतार नाटय़ मंडळ होडावडेने ‘जय मल्हार’, तृतीय क्रमांक कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ नेरुरने ‘हार गिळला खुंटीने’ तर उत्तेजनार्थ आजगावकर दशावतारी नाटय़ मंडळ आजगावने ‘सती महानंदा’ प्रयोग सादर करून पटकाविला.

या स्पर्धेत गणेशवंदना सादर करून प्रथम क्रमांक ‘कृष्णलीला’ नाटकाच्या जय हनुमान दशावतार मंडळाने, द्वितीय क्रमांक ‘सती महानंदा’ आजगावकर दशावतार, तर तृतीय क्रमांक ‘काशिविश्वेश्वर माहात्म्य’ श्री देवी माऊली दशावतार नाटय़ मंडळ इन्सुलीने पटकाविला. या सादरीकरणातील सवरेत्कृष्ट ट्रिकसिनमध्ये प्रथम क्रमांक ‘कृष्णलीला’ जय हनुमान दशावतार नाटय़ मंडळ आरोस, द्वितीय क्रमांक ‘जय मल्हार’ चेंदवणकर गोरे दशावतार नाटय़ मंडळ कवठी तर तृतीय क्रमांक ‘हार गिळला खुंटीने कलेश्वर दशावतार नेरुरने पटकाविला.

या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे राजपात्र, स्त्रीपात्र, खलनायक, नारद, विनोदी पात्रे अशी ठेवण्यात आली होती. त्यात राजपात्र (नायक) प्रथम क्रमांक ‘राजा विक्रम’ शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगणने हार गिळला खुंटीने प्रयोगातून कलेश्वर दशावतार मंडळातून सादर केला. द्वितीय क्रमांक ‘जय मल्हार’ राधाकृष्ण  दत्ताराम नाईक, तृतीय क्रमांक ‘वसुदेव’ विलास तेंडोलकर नाटक कृष्णलीलामधील प्रथम क्रमांक महानंदा भूमिकेत भगवान पांडुरंग कांबळी यांनी सती महानंदा नाटकात आजगावकर दशावतार मंडळाने, द्वितीय क्रमांक लक्ष्मी भूमिकेत सूर्यकांत रामा राणे यांनी भक्ती महिला नाटकात बोर्डेकर दशावतार मंडळ, दोडामार्ग, तृतीय क्रमांक अलोलिका भूमिकेत सुधीर जनार्दन तांडेल यांनी हार गिळला खुंटीने नाटकात पटकाविला.

या स्पर्धेत खलनायक सादरीकरणात कंस भूमिकेत रजनीकांत रामकृष्ण नाईक यांनी कृष्णलीला नाटकात, द्वितीय क्रमांक निकुंभ भूमिकेत विलास पांडुरंग गावडे यांच्या काशिविश्वेश्वर माहात्म्य, तृतीय क्रमांक गदासुर भूमिकेत सिद्धार्थ मेस्त्री यांनी भक्ती महिला अर्थात तीन नारायण नाटकात पटकाविला.

या स्पर्धेतील नाटकात नारदाची भूमिकादेखील लक्षणीय ठरली. त्यात प्रथम क्रमांकाच्या नारद भूमिकेत दत्तप्रसाद रमाकांत शेणई यांच्या नृसिंह अवतार नाटकात खानोलकर दशावतार खानोली यांचे सादरीकरणाने पटकाविला. द्वितीय क्रमांकाची नारद भूमिका विठ्ठल लाडू गावकर यांनी सती महानंदा नाटकात तर तृतीय क्रमांकाचा नारद भूमिका गौरव अजय शिर्के यांच्या मयूरेश्वर गणेश या महापुरुष दशावतार नाटय़ मंडळ गोठण सावंतवाडी यांनी पटकाविला.

या स्पर्धेतील विनोदी भूमिकेत प्रथम क्रमांक बया मावशी भूमिकेत तुकाराम गावडे यांच्या कृष्णलीला नाटक, द्वितीय क्रमांक अजामेळच्या भूमिकेत संजय वालावलकर यांच्या जय मल्हार, तृतीय क्रमांक तेली भूमिकेत पंढरीनाथ घाटकर यांचे ‘हार गिळला खुंटीने’ नाटकाने पटकाविला.

या सादरीकरणात वैयक्तिक संगीतमध्ये मृदंग/तबला प्रथम चंद्रकांत खोत (जय मल्हार), द्वितीय बाबली मेस्त्री (नृसिंह अवतार), तृतीय गंगाराम कळेकर (पावन झाली कोकण भूमी). हार्मोनियममध्ये प्रथम क्रमांक आनंद गोगटे (कृष्णलीला), द्वितीय क्रमांक गुणाजी गावकर (नृसिंह अवतार), तृतीय क्रमांक सचिन शंकर पालव (काशिविश्वेश्वर माहात्म्य) तर झांजमध्ये प्रथम क्रमांक विनायक सावंत (नृसिंह अवतार), द्वितीय लक्ष्मण मेस्त्री (भक्ती महिला), तर तृतीय क्रमांक सदाशिव महादेव मेस्त्री (सती महानंदा) ने पटकाविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2016 2:06 am

Web Title: legendary dashavatar drama competition in sawantwadi
Next Stories
1 पक्षसंघटनेत प्रभावासाठी राणेंचे ‘मराठा कार्ड’?
2 कणकवली नगर पंचायतीचा पर्यटन महोत्सव मे महिन्यात
3 वसुंधरादिनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ला सुरुवात
Just Now!
X