21 October 2020

News Flash

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची १६ डिसेंबरपासून सुरुवात

कामकाज सल्लागार समितीमध्ये अधिवेशनातील कामकाजासंदर्भात झाली चर्चा

संग्रहीत

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.१६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे.

अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधान परिषदेत सात अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, आशिष शेलार, अमिन पटेल, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय वड्डेटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आमदार विजय गिरकर, हेमंत टकले, डॉ. रणजित पाटील, शरद रणपिसे, सुरजितसिंह ठाकूर, भाई जगताप, अनिल परब, जयंत पाटील, रामहरी रुपनवर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 7:16 pm

Web Title: legislative winter session begins 16 december msr 87
Next Stories
1 धीरे धीरे प्यार को बढाना है; नवाब मलिक-संजय राऊत यांच्यात ‘ट्विट’ संवाद
2 अलिबाग: खांदेरी किल्ल्यावर दारु पिऊन धिंगाणा, दोन गटात तुफान हाणामारी; शिवप्रेमींमध्ये संताप
3 भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र यायला हवं- मनोहर जोशी
Just Now!
X