News Flash

रायगडमध्ये लेप्टोचा शिरकाव?

जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा झोपेत आणि संभ्रमात

(संग्रहित छायाचित्र)

रायगड जिल्ह्य़ात करोनाचा प्रभाव कमी झालेला असतानाच आता लेप्टोस्पायरोसीसने डोकं वर काढलं आहे. अलिबागसह पेण तालुक्यात लेप्टोचे संशयित रूग्ण आढळले आहेत.  मात्र जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा झोपेत आणि संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. या आजारासंदर्भात भीती व्यक्त केली जात असतानाच कुठलीही जनजागृतीची मोहीम राबवली जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील लेप्टोच्या संशयित रूग्णाचा मुंबईतील लीलावती रूग्णालयात मृत्यू  झाला. तर नागाव येथे तीन संशयित रूग्णाला मृत्यूने कवटाळले. मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणा या रूग्णांचा मृत्यू  नेमका कशामुळे झाला. हे सांगू शकलेले नाही. नागावचे सरपंच निखील मयेकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या सह जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणांना याची माहिती दिली आहे .

दरम्यान अलिबाग तालुक्यात लेप्टोचे साधारण १० संशयित रूग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

अलिबाग बरोबरच शेजारच्या पेण तालुक्यातदेखील लेप्टोचे संशयित रूग्ण असल्यााचे जिल्हा परीषदेचे माजी कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी सांगितले.

मात्र आरोग्य यंत्रणा त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. लेप्टोच्या  साथीमुळे ग्रामीण भागात नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मात्र जिल्हा परीषदेच्या आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभिर्याने घेतलेली दिसत नाही.

लेप्टो स्पायरेसीस या आजाराचा फैलाव जनावरांच्या  मलमूत्रातून होत असतो. विशेषत शेतामध्ये धान्य खाण्यासाठी येणारे उंदीर या आजाराचा फैलाव अधिक करतात. त्यामुळे दरवर्षी साधारण भातकापणीच्या हंगामात या रोगाचा प्रसार होत असतो. पायाला किंवा हाताला जखम झाली असेल तर त्याव्दारे जनावरांच्या मलमूत्राने दूषित झालेले पाणी शरीरात शिरते आणि हा आजार उद्भवतो.

त्यामुळे भातकापणीसाठी शेतात जाणार असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात काम करताना पायात गमबूट घालावेत. जखमा झाल्या असतील तर त्यावर तातडीने उपचार करावेत, असं आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

‘ लेप्टोच्या आजारासंदर्भात तक्रारी आल्या आहेत . आम्ही त्याची शहानिशा करतो आहोत . संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.  त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. ज्या भागात संशयित रूग्ण सापडले आहेत त्या भागात डॉक्सी सायक्लीरन गोळयांचा पुरवठा करण्यात आला आहे . औषधे पुरवताना खास शेतामध्ये कापणीच्या कामासाठी जाणाऱ्या वर्गावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे .

-डॉ. अभिजीत घासे, तालुका आरोग्य अधिकारी अलिबाग

‘जिल्ह्य़ात लेप्टोस्पायरेसीस या आजाराची चाचणी करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात यंत्रणा कार्यान्वीत आहे . ती पूर्णपणे मोफत केली जाते . संशयित रूग्णांनी आपली चाचणी करून घेणे गरजेचे आहे. या आजाराकडे दुर्लक्ष झाल्यापस आणि वेळीच उपचार न घेतल्यास तो बळावतो आणि त्यात रूग्णाचा मृत्यू होवू शकतो. त्यावमुळे याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने तपासणी करून उपचार घ्याचवेत.

– डॉ. सुहास माने , जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:09 am

Web Title: lepto infiltration in raigad abn 97
Next Stories
1 महाबळेश्वरच्या भूमीला आता ‘केशरी’ साज
2 शेतकऱ्यांना एक लाख कृषिपंप
3 झटका कायम! ठाकरे सरकारकडून वाढीव वीज बिलांमध्ये दिलासा नाहीच
Just Now!
X