News Flash

EDला सामोरा जाणार, CDचं नंतर बघूया! खडसेंची सूचक प्रतिक्रिया

चौकशीची ही पाचवी वेळ असल्याचंही म्हणाले आहेत.

संग्रहीत

“३० डिसेंबर २०२० रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचं समन्स मला मिळालं आहे. त्यानुसार मी हजर राहणार आहे. या अगोदर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तिकर विभाग यांनी चौकशी केलेली आहे. त्यावेळी मी सर्व कागदपत्रांसह हजर राहिलेलो आहे. आता देखील ईडी सांगेल त्या प्रमाणे मी त्यांना मदत करायला तयार आहे. भोसरीच्या भूखंड प्रकरणी ही चौकशी होत आहे. आतापर्यंत चारवेळा या संदर्भात चौकशी झालेली असून, ही पाचवी वेळ आहे. आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे, सीडीचं नंतर बघूया!” अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसेंनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषेदेत  खडसे बोलत होते.

यावेळी खडसे म्हणाले की,भोसरीचा भूखंड मी नाही माझ्या पत्नाने खरेदी केलेल आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे ५ कोटींचा आहे, या प्रकरणी चौकशी होत आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल, त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेल.

खडसेंना ईडी नोटीस पाठवण्यावरुन संजय राऊत संतापले; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नोटीसीवरून संताप व्यक्त केला आहे.

“आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 5:28 pm

Web Title: lets face the ed lets see the cd later khadses suggestive reaction msr 87
Next Stories
1 चंद्रकांत पाटील यांचं अजित पवारांना चोख प्रत्युत्तर, म्हणाले…
2 महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी; मोडला उच्चांक
3 “नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी ‘महात्मा’ होतं का?”
Just Now!
X