24 February 2021

News Flash

प्रवरानगरमध्ये ग्रंथपालाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांचे आंदोलन

ग्रंथपालाला पोलिसांनी अटक केली असून मुख्याध्यापिकेवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

पुण्यात स्वत:च्याच लहान मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगरमध्ये एका शाळेतील ग्रंथपालाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ग्रंथपालाला अटक केली आहे. या घटनेने संतापलेल्या पालकांनी शाळेच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन केले आहे.

प्रवरानगरमध्ये एका ख्यातनाम विद्यालयात भगवंता टोपे या ग्रंथपालाने शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. शाळेतील ग्रंथालयातच त्याने हे दुष्कृत्य केले होते. याप्रकरणी पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच पोलिसांनी ग्रंथपालाला अटक केली आहे. मात्र या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतप्त पालकांनी शुक्रवारी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले. मुख्याध्यापिकेवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 12:01 pm

Web Title: librarian allegedly molested girl inside library arrested in pravaranagar
Next Stories
1 सोलापूर – पुणे महामार्गावर अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
2 सुरेश जैन हे राजकारणाचे बळी- उद्धव ठाकरे
3 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना ठरावीक वेळेत प्रवेश बंदी
Just Now!
X