अन्न व औषधी प्रशासनातील औषध निरीक्षकांमार्फत मागील वर्षांत १ हजार ५२ तपासण्या करण्यात येऊन औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमाचे उल्लंघन केल्याने ९७ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.
श्रद्धा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (शिवाजी चौक), वरद लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (पद्मानगर), आशा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (औसा), तासिर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (औसा), केजीएन मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (आझाद चौक), ओंकार मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (औसा), न्यू महाराष्ट्र मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, ज्योती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (कासारशिरसी), धनश्री मेडिकल अँड जनरल स्टोअर्स गंगापूर, न्यू भारत मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (किनगाव), न्यू सावित्री मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (किनगाव), सदाशिव मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (किनगाव), श्रीसमर्थ मेडिकल (मुरुड), सोहम मेडिकल (कव्हा रस्ता, लातूर), व्यंकटेश मेडिकल (बाभळगाव), विठाई मेडिकल (लातूर), स्नेहा मेडिकल (जुना औसा रस्ता), साईकृपा मेडिकल (चाकूर), दीपक मेडिकल (जानवळ), महालक्ष्मी मेडिकल (अहमदपूर), आई मेडिकल (लातूर), शारदा मेडिकल (औराद शहाजनी) आदी ९७ औषध दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला. दुकानात फार्मासिस्ट नसणे, ग्राहकांना नियमित बिल न देणे आदी कारणांस्तव हे परवाने रद्द करण्यात आले.