24 October 2020

News Flash

चुलत भावाचा खून; दोघा सख्ख्या भावांना जन्मठेप

घर बांधण्याच्या वादावरुन कोल्हापुरात घडली घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर : घर बांधण्याच्या कारणावरून मारहाण होऊन चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना शुक्रवारी येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विजय दिनकर कारंडे (वय ४२ ) व त्याचा भाऊ राजेंद्र (वय ३९) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे असून त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये दंड दंडाची शिक्षाही आहे. तर, त्यांचे वडील दिनकर कारंडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. धनाजी कारंडे या चुलत भावाच्या खून प्रकरणी ही शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांनी सुनावली.

कारंडे बंधू हे बेले (ता. करवीर )येथे शेजारी राहतात. धनाजी कारंडे याने घर बांधण्यासाठी चिरा ठेवल्या होत्या. त्या आपल्या जागेत का ठेवले आहेत असे विचारणा विजय जाधव याने केली. त्यातून वाद चिघळला. चुलत भावाच्या दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये धनाजी कारंडे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नामदेव कारंडे यांनी फिर्याद दिली. ही घटना २८ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. इस्पुरली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. जी . पोवार यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी फिर्यादीच्या वतीने काम पाहिले. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आज वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.

Two Brother

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 11:55 pm

Web Title: life imprisonment two brothers for murder case in kolhapur scj 81
Next Stories
1 ‘व्ही-आय’चे ग्राहक दुसऱ्या दिवशीही संपर्काबाहेर
2 चांगली बातमी! महाराष्ट्रात १३ लाख ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त
3 मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी २७ ऑक्टोबरला, स्थगिती उठणार?
Just Now!
X