सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाल्याची माहिती कु लगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. चितमपल्ली यांनी निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी केली आहे. यात सोलापूर ही जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊ न त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी चितमपल्ली ठरले आहेत. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

रविवारी (१ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता विद्यपीठाच्या मुख्य सभागृहात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.  या कार्यœमास भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. जी. तिरुवसगम यांची ऑनलाइन माध्यमातून प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जिथे जन्मलो, जिथे शिकलो त्या जन्मगावी मिळणाऱ्या पुरस्काराचा आनंद शब्दात व्यक्त करता येणे अशक्य आहे. ५० वर्षे विदर्भात राहिलो, पण जन्मगावाची ओढ परत घेऊ न आली आणि आता हा पुरस्कार. त्यामुळे खूप आनंद आहे.

मारुती चितमपल्ली