लातूरच्या एमआयडीसीला मांजरा धरणातून सरकारने आरक्षित केलेल्या पाणीपुरवठय़ास अधीन राहून अधिकृत पाणीपुरवठा होत आहे, असे एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे पाणीपुरवठा उपअभियंत्यांनी म्हटले आहे. लातूर एमआयडीसीला मांजरा धरणातून १०.३ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा आरक्षित केला आहे. नियमानुसार एमआयडीसीला पाणीपुरवठा होत असे. धरणाची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नोव्हेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान एमआयडीसीच्या पाणीपुरवठय़ात घट करून ४.२२ दलघमी इतकाच पाणीसाठा मंजूर करण्यात आला. या काळात एमआयडीसीने पाणीटंचाई लक्षात घेऊन केवळ २.०२ दलघमी पाणी उचलले. गेल्या नोव्हेंबरपासून जूनपर्यंत एमआयडीसीला ४.४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मंजूर करण्यात आला. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन एमआयडीसीने या काळात केवळ १.३२ दलघमी पाणी वापरले.