News Flash

वीज कोसळून उस्मानाबादमध्ये दोन शेतमजूर महिलांचा मृत्यू

दुपारी वाऱ्यासह आभाळ भरुन आले. दीड वाजण्याच्या सुमारास महिला काम करीत असलेल्या ठिकाणी अचानक वीज कोसळली.

मृत शालुबाई बबन पवार आणि, शीतल तुळशीराम घुटुकडे

उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे आज (गुरूवार) दुपारी शेतात काम करत असताना वीज कोसळून दोन शेतमजूर महिला ठार झाल्या. तर सोबतच्या अन्य तीन महिला जखमी झाल्या.

वाणेवाडी येथील शालुबाई बबन पवार (वय ५०), शीतल तुळशीराम घुटुकडे (वय ३२) यांच्यासह श्यामल लहु सरवदे (वय ४०), कौशल्या शेषेराव सरवदे (वय ४५) व छाया भास्कर सरवदे (वय ५०) या महिला वाणेवाडी शिवारातील शेतीत मशागतीचे काम करीत होत्या. दरम्यान, दुपारी वाऱ्यासह आभाळ भरुन आले. दीड वाजण्याच्या सुमारास महिला काम करीत असलेल्या ठिकाणी अचानक वीज कोसळली. या घटनेत शालुबाई पवार व शीतल घुटुकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघी जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत शालुबाई यांच्या मागे एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. तर शीतल घुटुकडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 4:33 pm

Web Title: lightning at osmanabad two farm laborer woman dead and three injured
Next Stories
1 लिफ्टमध्ये महिलेला नको तिथे स्पर्श करुन विनयभंग, बोरीवलीतील टॉवरमधील घटना
2 मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कट ऑफमध्ये तीन टक्क्यांची वाढ
3 दुधीचा रस पिऊन पुण्यात ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू
Just Now!
X