विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका शेतकरी महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. गीता दशरथ मोहिते असे या महिलेचे नाव असून, या महिलेची छोटी मुलगीही जखमी झाली आहे.  तालुक्यात बुधवारी दुपारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. अकोलेसह राजूर, समशेरपूर परिसरास पावसाने झोडपून काढले.