News Flash

चखणा खाल्ला म्हणून पत्नीला पेटवले

२६ सप्टेंबर रोजी विरार पूर्व फुलपाडा परिसरात ही घटना घडली.

(संग्रहित छायाचित्र)

विरारोध्ये पतीने दारू पिण्यासाठी आणलेला चखणा बायकोने खाल्ला म्हणून त्याने रागाच्याभरात तिला पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची विरार पोलिसांनी नोंद घेत आरोपीला अटक केली आहे.

२६ सप्टेंबर रोजी विरार पूर्व फुलपाडा परिसरात ही घटना घडली. आरोपी वीरेंद्र परब (५०) याने रात्री मद्य पिऊन घरी परत आल्यावर सोबत आणलेला चखणा पत्नी नमिता परब हिने खाल्ल्याने काडेपेटीने तिची मॅक्सी पेटवून टाकली. त्यात ती ३० टक्के भाजली.

या प्रकारानंतर पतीने तिला संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार करून तिला घरी आणल्यावर बाहेर जाण्याचा बहाणा सांगून नमिता आपल्या भावाकडे गेली आणि घडलेला सर्व प्रकार तिने त्यास सांगितला.

तिच्यावर गुदरलेल्या या प्रसंगानंतर  तिच्या भावाने तिला जे जे रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता रुग्णालयाने विरार पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केला असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रणजीत परदेशी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 1:07 am

Web Title: lit the wife in virar abn 97
Next Stories
1 नवरात्रोत्सवात भाविकांना तुळजापुरात प्रवेशबंदी
2 रायगडमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण ८९ टक्कय़ांवर
3 उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा – तांबे
Just Now!
X