22 November 2019

News Flash

Nagar Palika & Parishad Election Result LIVE: नगरपालिकांमध्ये ‘कमळ’ फुलले, भाजप सर्वाधिक जागांवर विजयी

देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरली.

Nagar Palika and Nagar parishad election : काल या निवडणुकांसाठी मतदान झाले. वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता शांततेत सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून थेट नगराध्यक्षांची निवड प्रथमच होत आहे.

राज्यातील नगरपालिका- नगरपंचायती निवडणुकांच्या मतमोजणीत दुपारपर्यंत पिछाडीवर असलेल्या भाजपने अचानकपणे मुसंडी मारून आघाडी घेतली आहे.  त्यामुळे मिनी विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहका-यांची रणनिती यशस्वी ठरली आहे.

वाचा: निकालाची घटिका समीप; मुंबईकर ‘औकात’ दाखवणार!

पुणेकरांचा कौल कोणाला ?

सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हा भाजप चौथ्या स्थानावर फेकली गेली होती. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळविणाऱ्या भाजपचा जोर ओसरला, अशा छापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होत्या. एका बाजूला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप सुरूवातीपासूनच अन्य पक्षांपेक्षा सरस ठरत असताना प्रत्यक्षात नगरपालिका हातातून निसटत असल्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. सुरूवातीच्या ५७ जागांचे निकाल हाती आले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनुक्रमे १५ व १४ तर शिवसेनेने १२ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे भाजप थेट चौथ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, त्यानंतरच्या मतमोजणीत मुसंडी मारत भाजपने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आतापर्यंत साधारण ११५ नगरपालिकांचे कल हाती आले असून त्यामध्ये भाजपला सर्वाधिक २२, काँग्रेसला २१, राष्ट्रवादी १९ आणि शिवसेनेला १५ नगरपालिकांची सत्ता मिळाली आहे. याशिवाय २६ ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. तर यंदापासून नगराध्यक्षपदासाठी सुरू करण्यात आलेल्या थेट मतदानप्रक्रियेचाही भाजपला मोठा फायदा झाला आहे. राज्यातील ५२ नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे २५, काँग्रेसचे २२, राष्ट्रवादीचे १७ तर अन्य पक्षांचे ३० उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

आत्तापर्यंत नगरपालिकांमधील २, ५०१ जागांवरील निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४८२, काँग्रेसने ४०८, शिवसेनेने ४०२ जागांवर विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ तर बहुजन समाज पक्षाने ४ जागांवर विजय मिळवला आहे. अन्य पक्षांना ५८३ जागा मिळाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर मर्यादा असल्याचा मुद्दा मित्रपक्ष आणि विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता.  याच कारणामुळे भाजपला प्रत्येकवेळी इच्छा असूनही स्वबळावर लढण्याचा विचार बाजूला सारावा लागत होता. मात्र, नगरपालिकांचे निकाल हे स्वबळावर लढण्याच्याबाबतीत भाजपचा आत्मविश्वास वाढविणारे आहेत.

भाजपतील दिग्गजांचा पराभव

 

नक्की वाचा : Pune & Latur Nagar Palika & Parishad Election Result LIVE: पुण्यातील बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई; मतमोजणीला सुरूवात

Nagar Palika Election Result LIVE: लातूरमध्ये सर्वपक्षीयांमध्ये चढाओढ; ‘एमआयएम फॅक्टर’ ठरणार निर्णायक

भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, बबन लोणीकर यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. या विजयासाठी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

कोकणात राणे रिटर्न्स

कोकणात राणे कुटुंबियांनी केलेले जोरदार कमबॅक लक्ष वेधून घेणारे ठरले. राणेंच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने कोकणातील सावंतवाडी, देवगड नगरपालिकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. गेल्या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी सर्व १७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसने राणे यांच्या नेतृत्त्वाखाली ८ जागा मिळवल्या. शिवसेनेला याठिकाणी ७ जागा मिळाल्या असल्या तरी हा निकाल एकप्रकारे दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला बसलेला धक्का मानला जात आहे. याशिवाय, देवगड नगरपंचायतीत काँग्रेसने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हे निकाल म्हणजे नारायण राणे यांनी कोकणातील राजकारणात जोरदार पुनरागमन केल्याचे दर्शविणारे आहेत. दरम्यान, मालवण आणि वेंगुर्ल्यात बंडखोरीमुळे झालेल्या पराभवामुळे राणेंच्या यशात काहीशी उणीव राहिली आहे. मात्र, या अपयशासाठी नारायण राणे यांनी पक्षातील अंतर्गत बंडाळी आणि काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्त्वाला जबाबदार धरले आहे. वेंगुर्ल्यात काँग्रेसला ७ , भाजपला ६, अपक्षांना २ आणि शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. याठिकाणी नगराध्यक्षही भाजपचाच निवडून आला आहे. तर मालवणमध्ये भाजप व शिवसेनेला प्रत्येकी ५ , काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला २ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराला यश मिळाले आहे.

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला हादरा

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा फटका बसताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी ४ ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बहुतांश नगरपालिकेत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चौरंगी लढतीत सेनेने निर्विवाद यश मिळवले. यापैकी मनमाड नगरपालिकेत शिवसेनेला १९ तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय, नांदगाव, सिन्नर आणि भगूरमध्येही शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नांदगाव नगरपालिकेत शिवसेनेने ११ जागा जिंकल्या असून त्याजागी सेनेचा नगराध्यक्षही निवडून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला याठिकाणी फक्त ४ जागा जिंकता आल्या आहेत. हा निकाल छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत प्रभावी ठरत आलेला मनसे फॅक्टरही पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. याचा मोठा फायदा शिवसेनेला मिळताना दिसत आहे.

 

लोकसत्ता टीम November 28, 20163:08 pm

खेड नगरपरिषदेत शिवसेनेला १० तर मनसेला ७ जागा

लोकसत्ता टीम November 28, 20163:04 pm

काँग्रेस सरकारविरोधात आक्रमक नाही, नारायण राणे काँग्रेस नेतृत्वावर टीका

लोकसत्ता टीम November 28, 20163:04 pm

थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे गोंधळ: नारायण राणे

लोकसत्ता टीम November 28, 20163:04 pm

सावंतवाडी नगरपालिकेत काँग्रेसचा विजय. मात्र नगराध्यक्षपदी शिवसेना विजयी

लोकसत्ता टीम November 28, 20161:23 pm
रायगड: रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता
लोकसत्ता टीम November 28, 20161:22 pm
सिंधुदूर्ग: देवगड नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता
लोकसत्ता टीम November 28, 201612:39 pm
देवगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या कार्यालयावर अंडीफेक; भाजपचा रास्तारोको
लोकसत्ता टीम November 28, 201612:38 pm

नांदगाव: राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ४ जागा

लोकसत्ता टीम November 28, 201612:38 pm
नांदगावमध्ये छगन भुजबळांच्या वर्चस्वाला धक्का; ११ जागा जिंकून नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा
लोकसत्ता टीम November 28, 201611:52 am

रायगडच्या श्रीवर्धन नगरपालिकेत १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी; नगराध्यक्षपदी सेनेचे नरेंद्र भुसाणे विजयी

लोकसत्ता टीम November 28, 201611:45 am
नाशिकमध्ये मनसे फॅक्टर निष्प्रभ; शिवसेनेला मोठे यश
लोकसत्ता टीम November 28, 201611:45 am
देवगड नगरपंचायतीमध्ये काँग्रेस १०, शिवसेना १, भाजप ४, अपक्ष १, राष्ट्रवादी १ जागांवर विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201611:38 am
उत्तर महाराष्ट्रात भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका
लोकसत्ता टीम November 28, 201611:36 am
नाशिकच्या सिन्नर महापालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी १७ जागांवर विजय
लोकसत्ता टीम November 28, 201611:34 am
नाशिकमध्ये राष्ट्रवादीला भुजबळांच्या अनुपस्थितीचा फटका; नांदगाव आणि मनमाड पालिकेत शिवसेनेला आघाडी
लोकसत्ता टीम November 28, 201611:28 am
सिंधुदुर्गमधील देवगड नगरपंचायतीत काँग्रेसला बहुमत
लोकसत्ता टीम November 28, 201611:26 am
दापोली नगरपंचायतीत १७ जागांवर सात जागांवर शिवसेना विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201611:22 am
पालघर : तलासरी नगर पंचायत : १७ जागांपैकी, माकपाचे ११, भाजपचे ४ आणि राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201611:16 am
मनमाड नगरपालिका: शिवसेना १०, काँग्रेस ३ राष्ट्रवादी ३ जागांवर आघाडीवर
लोकसत्ता टीम November 28, 201611:09 am
पाथर्डीत भाजप १२ तर राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201611:06 am
पालघरच्या मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता
लोकसत्ता टीम November 28, 201611:03 am
चंद्रपूरमधील सिंदेवाही नगरपालिकेच्या १७ पैकी ११ जागांवर भाजप विजयी, पाच जागांवर काँग्रेस विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201610:58 am

सावंतवाडी नगरपरिषद: शिवसेनेला ७, काँग्रेसला ८ आणि भाजपला एक जागा

लोकसत्ता टीम November 28, 201610:58 am
या नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार असताना दीपक केसरकर यांनी १७ जागावरही यश मिळवून विरोधकांना पाणी पाजले होते
लोकसत्ता टीम November 28, 201610:57 am

सावंतवाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस; दीपक केसरकर यांना धक्का

लोकसत्ता टीम November 28, 201610:53 am
राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद कोरे रहिमतपूरचे नगराध्यक्ष
लोकसत्ता टीम November 28, 201610:51 am
साताऱ्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी; चार जागा काँग्रेसला
लोकसत्ता टीम November 28, 201610:50 am
कवठेमहांकाळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास पक्षाची आघाडी विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201610:50 am
नाशिकच्या भगूर नगरपालिकेतील १८ पैकी १७ जागांवर शिवसेना विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201610:30 am

मनमाडमध्ये पहिला कौल शिवसेनेला, प्रभाग १ मधील दोन जागांवर शिवसेना आघाडीवर

लोकसत्ता टीम November 28, 201610:27 am
पन्हाळा नगरपालिकेत जनसुराज्य पक्षाला बहुमत; नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत रूपाली धडेल विजयी
लोकसत्ता टीम November 28, 201610:06 am

थोड्याचवेळात मतमोजणीला सुरूवात

First Published on November 28, 2016 7:57 am

Web Title: live nagar palika and nagar parishad election results maharashtra
Just Now!
X