बचेंगे तो और भी लढेंगे.. हम बचेभी है और लढेंगे भी, अशी डरकाळी फोडत हा भुजबळ अजून संपलेला नाही..न्यायदेवतेवर माझा विश्वास होता..आहे.. आणि राहणार.. न्याय देवतेमुळे मला बाहेर येता आले. भविष्यात मी माझी बाजू मांडून निर्दोष सुटेल. मी पुनश्च हरिओम करणार आहे, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिला. मराठा आरक्षणाला आपला कधीच विरोध नव्हता. पण माझा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे भासवण्यात आले. मी मंडल आयोगासाठीच (आरक्षणासाठी) शिवसेना सोडली. मी कशाला मराठा आरक्षणाला विरोध करू असे सांगत मराठा आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ व्या वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जामिनावर सुटल्यापासून त्यांनी मौन धरले होते. त्यामुळे त्यांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपावर निशाणा साधत आपण निर्दोष असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याप्रकरणी ते तुरूंगात होते. त्याचीही त्यांनी विस्तृत माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी शेरो-शायरी, हिंदी चित्रपटांचे डायलॉग, गाणी यांचा वापर केला.

काय म्हणाले छगन भुजबळ

– आगामी काळात जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार

– पक्ष जिथे बोलवले तिथे मी जाण्यास तयार

– शेतकरी आता आत्महत्या करीत नाही तर उद्योगपती करतोय

– सरकारी कर्मचारीसुद्धा सुखी नाही. सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे.

– इंदिराजींनी लावलेली आणीबाणी घटनेप्रमाणे होती. आताची आणीबाणी घटनेपलीकडील

– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाला घेऊन मी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल.

– आरक्षणाच्या मुद्यावरून मी शिवसेना सोडली. मी राष्ट्रवादी का सोडेन ?

– अच्छे दिन आले, सांगा कुठला शेतकरी खूश आहे

– आरक्षणाला अन्य पक्षांचा विरोध, पण शरद पवारांचेचे आरक्षणाला समर्थन

– केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी

– १०० कोटीचा खर्च असताना ८५० कोटीचा घोटाळा झाला कसा

– महाराष्ट्र सदन सुंदर.. छगन भुजबळ अंदर

– जनतेचे प्रेम मात्र जप्त करू शकले नाही

– इतक्या धाडी टाकून त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

– इडीच्या धाडीमुळे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला.

– एकाच ठिकाणी सात-सात वेळा धाडी टाकल्या.

– कुटुंबाला झालेला त्रास सांगताना भुजबळ गहिवरले.

– अनेकांनी मी बाहेर यावे म्हणून प्रयत्न केले.

– कुटुंबीयांची सर्व संपत्ती अटॅच केल्या. ज्यांचा संबंधच नाही अशी संपत्तीही अटॅच केली.

– महाराष्ट्र सदनाचे कंत्राट देताना मी मंत्री नव्हतो

– आज पक्षाचा पुण्यात हल्लाबोलचा समारोप होत आहे तर माझ्यावर दोन वर्षांपूर्वी हल्लाबोल झाला होता

– सर्व पक्षीय नेत्यांनी माझी सुटकेनंतर भेट घेतली. त्यात दोन वर्षांत सुप्रिया सुळे अनेक कारणानी भेटत