News Flash

किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. सगळ्यांनी शिस्त पाळली, धीरोदात्तपणा दाखवला आहे त्याचं कौतुक आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या १ हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र ही आपल्याला फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे ३३ हजार चाचण्या घेण्यात आल्या असून १५७४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर ३० हजार ४७७ जणांचे निगेटिव्ह आहेत. १८८ रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.

दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर करोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. आकाश पांघरुनी जग हे शांत झोपलेले हे गाणं आठवतं आहे. आकाश तर पांघरलं आहे पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तुम्हाला वाटेल की परिस्थिती गंभीर असताना मला गाणं कसं सुचतं ? पण आज मला या गाण्याच्या ओळी आठवत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 5:15 pm

Web Title: lock down is extended till april 30 says cm uddhav thackeray scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रेशनवरील धान्याचा काळाबाजार; दुकानदारावर गुन्हा दाखल
2 काळाबाजार..! बीडमध्ये पेट्रोल १५० रुपये लिटर, तेही रॉकेल मिश्रीत
3 Coronavirus : करोना झाल्याच्या भीतीने नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या
Just Now!
X