राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग कमी होताना दिसत नाही. काही जिल्ह्यांमध्ये तर करोनाने आणखी जोर पकडला आहे. हे लक्षात घेत आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात आला आहे. १ ते ८ जुलै या काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. रुग्णवाढीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलै या काळात लागू निर्बंध होणार आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
uture of 574 candidates in Talathi recruitment is uncertain
तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवार ३० जून नंतर ८ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी डिजिटल पत्रकार परिषदेत सांगितले.