करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यत १७ ते २६ जुलै दरम्यान टाळेबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यत करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा टाळेबंदीचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिला होता. यासाठी सुरुवातीला त्यांनी बाजारपेठ व दुकानांच्या वेळा कमी केल्या होत्या. तरीही करोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आज त्यांनी टाळेबंदी लागू केली. जिल्ह्य़ात १७ ते २२ जुलै दरम्यान ही टाळेबंदी असणार आहे. या काळात शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, उद्योग, कार्यालये संपूर्णत: बंद राहतील.

२२ ते २६ जुलै या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.

सर्व दुकाने, व्यवसाय, उद्योग, कार्यालये संपूर्णत: बंद

जिल्ह्य़ात १७ ते २२ जुलै दरम्यान ही टाळेबंदी असणार आहे. या काळात शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, उद्योग, कार्यालये संपूर्णत: बंद ठेवण्याचे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय घराबाहेर कुणीही न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाई  केली जाईल. सर्व मार्ग बंद राहतील.