News Flash

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील – अस्लम शेख

लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. वीकेंड लॉकडाउनही करण्यात आला आहे. मात्र, करोना रुग्णवाढीला फारसा ब्रेक लागत नसल्याने आणि आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन सरकार लॉकडाउनच्या विचारात आहे. लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, याला आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही दुजोरा दिला आहे.

लॉकडाउनची चर्चा सुरू असून, यापार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार. लॉकडाउन हा शब्द लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. कारण रात्री आठ वाजता यायचं आणि लोकांसमोर बोलायचं. लोक मग या मानसिकतेतून बाहेर येत नाही. राज्य सरकारला चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन लोकांचं म्हणणं ऐकून आम्हाला हे करायचं आहे. पुढील काळासाठी चांगल्या गाईडलाईन्स तयार करण्यासाठी आम्ही लागलो आहोत. मला वाटत आजच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

“महाराष्ट्रातील परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. मुंबईत जशी जम्बो कोविड सुविधा तयार केली गेली. तशी राज्यात गेल्या. त्या जम्बो कोविड सेंटरमध्ये बेड वाढवण्यात आले. पण, काही लोकांना खासगी रुग्णालयात जायचं असतं, तिथं वेटिंग लिस्ट आहेत. पण आजही शासकीय असो वा महापालिका रुग्णालय असो, तिथे जागा उपलब्ध आहे. तिथे ऑक्सिजनही उपलब्ध आहेत. जम्बो कोविड केंद्रात जास्तीत जास्त बेड हे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड आहेत. आताची स्थिती बघून आपण नाईट कर्फ्यू लावला. दिवसा जमावबंदी केला. वीकेंड लॉकडाउन करुन बघितला. पण, जितकी रुग्णसंख्या कमी होणं अपेक्षित आहे, तितकी होत नाही. त्यामुळे सरकार सगळ्यांचे सल्ले घेत होते. त्यातून आज गाईडलाईन्स तयार होतील आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल,” असंही अस्लम शेख म्हणाले.

“एसओपी (लॉकडाउन गाईडलाईन्स) निश्चित झाल्यानंतर किती दिवसांसाठी लागू केली जाईल, हे सर्वांनाच कळेल. टास्क फोर्समधील काही लोकांचं म्हणणं होतं की, २१ दिवसांचा लॉकडाउन लावावा. काही लोकांचं म्हणणं होतं की, लोकांना त्रास होईल त्यामुळे दोन आठवड्यांचा (१४ दिवसांचा) लावा. तर काहीचं म्हणणं होतं एक आठवडा लावावा. कारण संक्रमणाची साखळी तुटली पाहिजे. त्यामुळे बाकीच्या सुविधा तयार करता येतील. सगळ्यांच्या सूचना घेऊनच निर्णय घेतोय. फक्त अधिकाऱ्यांचंच ऐकायचं असं नाही,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:05 pm

Web Title: lockdown in maharashtra maharashtra lockdown guardian minister aslam sheikh bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2 शरद पवारांच्या साताऱ्यातील ‘त्या’ वादळी सभेवरुन फडणवीसांचा टोला; म्हणाले…
3 करोना स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी – फडणवीस
Just Now!
X