News Flash

नगरमध्ये आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार, सुजय विखेंबरोबर रंगणार लढत

विधानसभा निवडणुकीत त्यांनी २५ वर्षे आमदार राहिलेले शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता.

भाजपाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. त्यामुळे आता नगरमध्ये संग्राम जगताप विरूद्ध सुजय विखे-पाटील असा दोन युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नगर शहराचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. भाजपाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. त्यामुळे आता नगरमध्ये संग्राम जगताप विरूद्ध सुजय विखे-पाटील असा दोन युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे संग्राम जगताप हे नेवासा-राहुरीचे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावेळी कर्डिले हे मंचावर आघाडीवर होते. आता जावयालाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने कर्डिले नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नगरच्या उमेदवारीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी दीर्घकाळ वाद रंगला. काँग्रेसने या जागेची राष्ट्रवादीकडे मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने जागा सोडण्यास नकार दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे हे इथून लढण्यासाठी इच्छुक होते. दिल्लीवरुन राष्ट्रवादीला या जागेसाठी विचारणा होऊनही राष्ट्रवादीने जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सुजय यांनी थेट भाजपात प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीची अद्याप घोषणा झाली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सुजय यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत होणार हे स्पष्ट होते.

दरम्यान, संग्राम जगताप हे दोन वेळा नगरचे महापौर होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी २५ वर्षे आमदार राहिलेले शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 7:45 pm

Web Title: lok sabha election 2019 sangram jagtap ncp candidate in nagar lok sabha constituency bjps sujay vikhe may be opponent
Next Stories
1 अखेर राजीनामा बाहेर! शिवसेना आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी
2 नीरव मोदीच्या अटकेमुळे चौकीदाराचा प्रभाव दिसला – माधव भंडारी
3 माढाची उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटील यांनाच मिळणार होती – जयंतराव पाटील
Just Now!
X