गुढी पाडवा संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाण्याच्या समस्येने लोकांना बेचैन केले आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सीमाभागात असलेल्या उंबरीपठार गावातील लोकांनाही पाण्याच्या समस्येला प्रत्येकवर्षी सामोरं जावं लागतेय. गावांपासून पाच किमी.वर दोन धरणं असतानाही गावांत पाण्याची गंभीर समस्या आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गावकऱ्यांनी मदतदानावर बहिष्कारही टाकला आहे. आधी पाणी द्या मग मतदान करतो, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. पण प्रचार करणाऱ्यावर याचा कोणताही परिणाम होत नाही.

अश्निनी संजय डोंगरे पंचविशीतील तरूणीचे उंबरीपठार हे मामाचे गाव. सुट्टीसाठी ती इथं आली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या या तरूणीने गावातील लोकांसाठी पाणी आणि मातीचे सर्वेक्षण केले. ती म्हणतेय, उंबरीपठार गावात पाण्याची गंभीर समस्या आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये सोडलं जाणारे पाणी नाल्यातील असते. त्या नाल्यातील पाण्यात गुरे,कुत्रे, गायी आणि जनावरे अंघोळ करतात. तेच दुषित पाणी गावाला दिले जाते. या दुषित पाण्यामुळे गावांतील लोकांना गंभीर आजार झाले आहेत. किडनी आणि मुतखड्यासारख्या आजारामुळे अनेकांनी प्राणही गमावले आहेत. सध्या गावातील २०० ते २५०० जणांना किडनी आणि इतर आजार झाले आहेत.

सरपंच, लोकप्रतिनीधी, आमदार आणि खासदारांनी या गावाकडे दुर्लक्ष करू नये. गावातील लोकांची पाण्याची समस्या दूर केल्यास त्यांचे भले होईल. गावांत पाणी आल्यास गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळेल. लोकांना होणारे आजार कमी होतील. त्यांना रोजगार मिळेल. लग्नाची समस्या दूर होईल. लोकांना मतदान करण्याची इच्छा होईल. गावात प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नेत्यांना येथील लोक आपली समस्या सांगतात. पाण्याची समस्या दूर केल्यास आम्ही तुम्हाला मत देऊ असे कळवळीने सांगतात. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. या गावकऱ्यांकडे असेच दुर्लक्ष केल्यास गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतील.

अश्निनी संजय डोंगरे मामांच्या गावात आल्यानंतर तिला येथील पाण्याची समस्या समजली. त्यानंतर तिने गावात सर्वे केला. येथील मातीचे परिक्षण केले. त्यामध्ये तिला असे जाणवले की, वर्षानुवर्षांच्या पाण्याच्या समस्येमुळे येथील माती कोरडी आहे. उंबरीपठार हे गाव पठारावर असल्यामुळे येथे दगडांचे प्रमाण जास्त आहे. येथे एख्याने विहिर जरी खोदायचे म्हटले तरी खूप पैसा खर्च करावा लागतो शिवाय पाणी लागण्याची शक्यता कमीच.

गावाजवळ पाच किलोमिटरवर अरूणावती आणि देवगाव अशी दोन धरणं आहेत. या दोन्ही धरणातून गावात पाणी आल्यास गावातील लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. शेजारील दोन्ही गावात या धरनातून पाणी येतं. मग, उंबरीपठरला का नाही? जर गावात पाणी पोहचले तर, सध्याची येथील परिस्थिती बदलेल. लोकांना रोजगार उपलबद्ध होईल. शेती सुजलम सुफलम होईल. गाव सीमालगत असल्यामुळे लोकप्रतिनीधींनी या गावांकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी होते आहे