22 July 2019

News Flash

प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी गुलदस्त्यात, वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

अॅड. प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ३७ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

या यादीमध्ये मात्र, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मध्यतंरी प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती. परंतु, या यादीत सोलापूरच्या जागाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

उमेदवारींची नावे –
1. धनराज वंजारी -वर्धा
2. किरण रोडगे -रामटेक
3. एन.के.नान्हे – भडांरा-गोंदिया
4. रमेश गजबे -गडचिरोली(चिमूर)
5.राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर
6.प्रवीण पवार -यवतमाळ(वाशीम)
7.बळीराम सिरस्कार -बुलढाणा
8. गुवणंत देवपारे-अमरावती
9.मोहन राठोड-हिंगोली
10.यशपाल भिंगे-नांदेड
11.आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी
12.विष्णू जाधव-बीड
13.अर्जुन सलगर-उस्मानाबाद
14.राम गारकर-लातूर
15.अजंली बावीस्कर-जळगाव
16.नितीन कांडेलकर-रावेर
17. शरदचंद्र वानखेडे-जालना
18.सुमन कोळी-रायगड
19.अनिल जाधव-पुणे
20.नवनाथ पडळकर-बारामती
21.विजय मोरे-माढा
22.जयसिंग शेंडगे-सांगली
23.सहदेव एवळे-सातारा
24.मारूती जोशी-(रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
25.अरूणा माळी-कोल्हापूर
26.अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले
27.दाजमल गजमल मोरे-नंदुरबार
28.बापू बर्डे-दिंडोरी
29.पवन पवार-नाशिक
30.सुरेश पडवी-पालघर
31.ए.डी.सावंत-भिवंडी
32.मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे
33. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण
34.संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
35.संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई
36.राजाराम पाटील-मावळ
37.अरूण साबळे-शिर्डी

First Published on March 15, 2019 6:00 pm

Web Title: loksabha election 2019 vanchit bahujan aghadi candidate list for loksabha 2019