21 September 2020

News Flash

‘लोकसत्तामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ’

लोकसत्ता ‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी लिहिते झाले.

राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या शिवचंद्र स्वामी यास प्रमाणपत्र व प्रथम पारितोषिक देताना प्राचार्य उमाकांत बिरादार, ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, सहायक व्यवस्थापक सदाशिव देशपांडे, प्रा. सुधीर अनवले आदी. (छाया - श्याम भट्टड, लातूर)

लोकसत्ता ‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी लिहिते झाले. आपणही शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा मागे नाहीत, हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत बिरादार यांनी केले.
लोकसत्ता ब्लॉग बेंचर्समध्ये १८ ते २४ मार्च या आठवडय़ातील ‘सडक्यातले किडके’ या अग्रलेखावर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील बीए तृतीय वर्षांत शिकणारा शिवचंद्र स्वामी हा विद्यार्थी राज्यात पहिला आला. लोकसत्तातर्फे प्रमाणपत्र व ७ हजार रुपयांचा धनादेश देऊन प्राचार्याच्या हस्ते स्वामीचे कौतुक करण्यात आले. लोकसत्तेला वैचारिक विश्वात वलयाचे स्थान आहे. ब्लॉग बेंचर्सच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत असल्याबद्दल मनस्वी आनंद झाला, अशी भावना शिवचंद्र स्वामी याने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:12 am

Web Title: loksatta blog benchers 7
Next Stories
1 लातूरकरांचे भगीरथ प्रयत्न
2 मेळघाट, नंदूरबारमध्ये वर्षभरात ३१२ बालमृत्यू
3 शनिचौथऱ्यावर आता महिलांनाही प्रवेश; गुढीपाडव्याला विश्वस्तांना सुबुद्धी
Just Now!
X