News Flash

लग्न मोडल्याच्या रागातून चुलत भावावर हंल्ला

लग्न मोडल्याच्या रागातून सख्ख्या चुलत भावानेच अभिषेक राजपुतवर प्राणघातक हल्ला केल्याचे उघड झाले आहे.

लग्न मोडल्याच्या रागातून चुलत भावावर हंल्ला
(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र)

लग्न मोडल्याच्या रागातून सख्ख्या चुलत भावानेच अभिषेक राजपुतवर प्राणघातक हल्ला केल्याचे उघड झाले आहे. जितेंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत (२४) असे हल्लेखोराचे नाव असून अलिबाग पोलीसांनी त्याचा अटक केली आहे. जितेंद्र याला पोलिसांनी न्यायलायत हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  जितेंद्रसिंग याचे राजस्थान मधील एका मुलीबरोबर लग्न ठरले होते. जितेंद्र याला वाईट सवयी असल्याबाबतची माहिती अभिषेक याने आपल्या वडिलांना सांगितली होती. अभिषेखच्या वडिलांनी जितेंद्र हा दारू पितो त्याला वाईट सवयी असल्याबाबतची माहिती जितेंद्रच्या सासू सासऱ्यांना सांगितली होती. त्यामुळे त्यांनी मुलगी न देण्याचा निर्णय घेतला होता. याची सल जितेंद्रसिंग याच्या मनात खदखदत होती. याच रागातून त्याने  अभिषेकचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

यानंतर चिरंजीव गुंडाळे या मित्राला सोबत घेऊन तो अभिषेकच्या कॉलेज मध्ये आला. अभिषेकला सोबत घेऊन तिघेही कुरुळच्या टेकडीवर गेले. जितेंद्रसिंगच्या डोक्यात कुठला कट शिजतो आहे याची कल्पनाही अभिषेकला नव्हती. यानंतर चिरंजीव याला बाहेर थांबण्याची सुचना करून जितेंद्रसिंग अभिषेकला एका पडक्या घरात घेऊन गेला. दगड आणि बिअरच्या बाटलीच्या सहाय्याने त्याने अभिषेकच्या डोक्यात वार करण्यास सुरवात केली. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. मारहाणीचा आवाज ऐकुन चिरंजीव घटना स्थळी धावत आला. मात्र संतापलेल्या जितेंद्रने त्याच्या हातावरही वार केला. घटनेबाबत कोणाला सांगितलेस तर तुला पण जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अभिषेखला रक्ताच्या थारोळ्यात टाकून जितेंद्र आणि रघुनाथ हे फरार झाले. ही घटना कुरुळ ग्रामस्थांना कळल्यावर अभिषेखला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला मुंबई येथे हलविण्यात आले. या हल्ल्यात अभिषेख बचावला असून त्याच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

गुन्हा केल्यानंतर जितेंद्र मुंबईला पळून गेला. तर चिरंजीव याने पोयनाड येथे जाऊन स्वतावर उपचार करून घेतले. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीसांनी तपासाची चक्र फिरवण्यास सुरवात केली, कॉलेज मधील सिसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा चिरंजीव आणि जितेंद्रसिंग यांच्या सोबत अभिषेक बाहेर पडल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात चिरंजीव याने झालेला प्रकार घरच्यांना कळवला आणि झालेल्या प्रकार सांगीतला. यानंतर जितेंद्रसिंग याला पोलीसांनी अटक केली.  त्याला आज अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सदर गुन्ह्याचा तपास डीवायएसपी डी. बी. निघोट, पोलीस निरीक्षक  दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कवळे, पोलीस हवालदार एन. टी. म्हात्रे, पोलीस शिपाई फड, पोलीस नाईक कोंडे,पोलीस हवालदार संदेश सानप यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2018 12:55 am

Web Title: loksatta crime news 116
Next Stories
1 पराभव होऊनही विरोधकांकडून अद्याप मतदान यंत्रावर आक्षेप नाहीत
2 राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये चिंताजनक वाढ
3 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार हजार कोटींची अंतरिम वेतनवाढ
Just Now!
X