रायगड जिल्ह्यत अल्पवयिन मुली आणि महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यात महिलांवरील अत्याचाराची ६६ प्रकरणे समोर आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात १३ अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांचाही समावेष आहे.

रायगड पोलीस दलाच्या हद्दीत डिसेंबर महिन्यात महिला अत्याचाराची ३१ प्रकरणे समोर आली. जानेवारी महिन्यात २२ महीलांवरील अत्याचारांची नोंद झाली. यात विनयभंगाच्या २२ तर बलात्काराच्या सात प्रकरणांचा समावेष होता. महिला अपहरणाची १६ प्रकरणे, वैवाहित स्त्रीयांच्या छळाची ६ प्रकरणे समोर आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यांत अल्पवयिन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे.

बालकांचे लंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अर्थात पॉस्को कायद्या अंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १३ प्रकरणांची नोंद झाली. यात सहा अल्पवयिन मुलींवरील बलात्कारांच्या तर सात विनयभंगांच्या तक्रारींचा समावेष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महिला आणि अल्पवयिन मुलींवरील वाढलेल्या अत्याचाराचे प्रमाण हे प्रमाण समाजातील विकृत मनोवृत्ती बळावल्याचे द्योतक आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यंना गांभिर्याने घेण्याची वेळ आली आहे. या घटना रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेच आहे. पोलीस कारवाई बरोबरच किशोरवयिन मुलांचे मानसिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.

बरेचदा आपली आणि कुटूंबाची बदनामी होईल या भितीपोटी अनेकदा मुली समोर येऊन तक्रारी देत नाही. त्यामुळे अन्याय आणि अत्याचार करणारयांची मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते. आणि त्याचा परिणाम इतर मुलींना भोगावे लागतात. त्यामुळे मुलींनी आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात समोर येऊन तक्रार देण गरजेच आहे. पालकांनी आपल्या मुला मुलींचे संगोपन करतांनाच याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे.

महिला वरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीसांकडून प्रयत्न केले जात आहेत. शाळा आणि महाविद्यालयात जाऊन जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. दामिनी पथक, महिला हेल्प लाईन कार्यान्वयित करण्यात आली आहे. प्रतिसाद नामक एक मोबाईल अँप्लीकेशन कार्यन्वयित करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात, सार्वजनिक ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सुचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

‘पालकांनी आपल्या मुलांचे या संदर्भात प्रबोधन करणे गरजेचे आहे. महिला अत्याचारा संदर्भात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेण्याची, महिला कर्मचारी अथवा अधिकाऱ्याकडून त्यांची चौकशी करण्याचे सुचना सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आल्या आहेत. तपासी अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांना संवेदनशीलतेनी कसे हाताळावे. यासंदर्भातही पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून कार्यशाळा घेऊन सुचना देण्यात आल्या आहेत.’     – एस एस पाटील, महिला विभाग प्रमुख, रायगड पोलीस