News Flash

मनमाडमध्ये चोरीच्या पाच दुचाकी जप्त

पोलीस नाईक दीपक गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

शहर पोलिसांच्या पथकाने ठिकठिकाणाहून चोरीस गेलेल्या पाच मोटारसायकली ताब्यात घेतल्या. शहर व परिक्षेत्रातील मोटारसायकली चोरुन त्या कमी किंमतीत शहरात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आले. पाच मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

पोलीस नाईक दीपक गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस दुचाकी चोरटय़ांचा तपास करीत असताना रज्जाक अली इशाक अली (हजरानगर, अमरावती) याने कोठूनतरी मोटारसायकली चोरुन आणल्या असून सदर मोटारसायकली मनमाडमध्ये वि केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. त्यात दोन लाख ४० हजार रूपयांच्या पाच मोटारसायकलीरज्जाक अली इशाक अली याच्या ताब्यातून हस्तगत केल्या. रज्जाकने या मोटारसायकली चोरुन आणल्या होत्या. त्यांना बनावट नंबर फलक लावून त्या वि केल्या होत्या. या चोरीच्या मोटारसायकली केवळ पाच ते सात हजारांना विकत घेऊन त्यांचा वापर करण्याच्या कारणावरून रज्जाकसह जफर अफसर शेख (मनमाड), काळ्या उर्फ शुभम बोहत यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अशा प्रकारच्या मोटारसायकली कोणी खरेदी केल्या असल्यास त्यांनी तातडीने या मोटारसायकली पोलीस ठाण्यात जमा कराव्यात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. बेकायदेशीर व्यवहाराने खरेदी केलेल्या मोटारसायकलींबाबत संबंधीतांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक पी. टी. सपकाळे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:50 am

Web Title: loksatta crime news 6
Next Stories
1 सूरजागडवरील लोह उत्खननासाठी ५ सशस्त्र पोलिस दूरक्षेत्रांना मंजुरी
2 लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांकडून चतुर्भुज
3 उद्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक, प्रशासनाची तयारी पूर्ण
Just Now!
X