मुलांनो… घरी बसून कंटाळलात? करोनामुळे तुम्हीही त्रस्त झाला असाल ना? मग वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडला असेल. आम्ही आलोय एक भन्नाट आयडिया घेऊन. लोकसत्ता डॉट कॉम आणि ‘युनिसेफ’ ही जागतिक संघटना एकत्र येऊन ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी एक स्पर्धा भरवतोय. ही स्पर्धा आहेच… शिवाय यातून हे चिमुकले जनतेमध्ये जागृतीही करू शकणार आहेत… संदेश पोहोचवू शकणार आहेत.

करोना वाढतोय आणि लॉकडाउनच्या या काळातही अनेक जण घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यासाठी आणि घरात बसून कंटाळलेल्यांसाठी तुम्ही एकच संदेश द्यायचा आहे.. तो म्हणजे “घरीच राहा, सुरक्षित राहा!” यासाठी चिमुकल्यांनो तुम्ही हव्या त्या माध्यमातून व्यक्त होऊ शकता. चित्र काढा, व्हिडिओ तयार करा, क्राफ्टिंग करा, स्लोगन लिहा काहीही करा. पण त्यातून एकच संदेश जायला हवा… “घरीच राहा, सुरक्षित राहा!”

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य
Moscow concert hall attack suspects confess
मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब
fraud of 15 lakhs with competitive examinee
पुणे : स्पर्धा परीक्षार्थी तरुणीची १५ लाखांची फसवणूक

वयोगट कोणता?
६ ते १४ या वयोगटातील कोणताही मुलगा/मुलगी यात सहभागी होऊ शकतात.

कुठे पाठवायचं ?
तुमचं चित्र, वरील संदेश देणारा व्हिडिओ, क्राफ्रिंगचा व्हिडिओ, स्लोगन या पैकी जे काही तुम्ही तयार कराल ते onlineloksatta@gmail.com या इमेल अॅड्रेसवर पाठवा. आपली कलाकृती पाठवताना सोबत सहभाग घेणाऱ्याचे पूर्ण नाव, त्यांच्या पालकाचा मोबाईल नंबर आणि ई-मेल अॅड्रेस पाठवावा.

मुदत कधीपर्यंत?
तुमची कलाकृती तुम्ही आम्हाला २८ एप्रिल २०२० पर्यंत कधीही पाठवू शकता.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना काय मिळणार बक्षीस?
येणाऱ्या सर्व कलाकृतींतून लोकसत्ता आणि युनिसेफचे जुरी मेंबर पाच विजेते निवडतील. त्यांना उत्कृष्टतेसाठी खास डिजिटल प्रमाणपत्र दिलं जाईल. शिवाय पहिल्या शंभर उत्कृष्ट कलाकृतींसाठीही सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. याशिवाय या उत्कृष्ट आणि निवडल्या गेलेल्या कलाकृतींना लोकसत्ता डॉट कॉमच्या सोशल मीडियावर आणि युनिसेफद्वारे प्रसिद्धी दिली जाईल.

तर मग… बालमित्रांनो लागा कामाला… चालवा डोकं… तुमच्या छोट्याशा डोक्यामधून येऊ द्या भन्नाट आयडियांचा खजिना बाहेर… द्या जगाला संदेश…
आम्ही वाट पाहतोय, तुमच्या ईमेलची…